जवाहरनगर (Bhandara):- भंडारा तालुक्यातील अशोकनगर येथे दि.१२ जून रोजी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन दिवसा अगोदर लग्न झालेल्या नववधूने हळद सुकण्याआधीच सासरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केली. अनिता नंदागवळी असे मृतकाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही
मृतक अनिता ही मूळची छत्तीसगड येथील असून शहापूर येथे आपल्या नातेवाईकांकडून तिचे अशोकनगर येथील इंजि.आकाश नंदागवळी याचेशी दि.९ जून रोजी शहापूर येथे लग्नसमारंभ(wedding ceremony) पार पडला. १० तारखेला स्वागत समारंभ होऊन १२ जून रोजी तिला माहेरचे लोक नेण्याकरिता येणार होते. पाहुणे घरीच असताना तिने ‘वॉशरूम मधून येते’ म्हणून वरच्या माळ्यावर गेली. बरीच वेळ होऊनही अनिता आली नाही. म्हणून वरच्या माळ्यावर जाऊन पाहिले असता अनिता बाथरूम मध्ये गळफास (hanging) घेतलेल्या स्थितीत आढळून आली. तिला भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जवाहरनगर पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरीता (Autopsy) पाठविण्यात आले. याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. सुखी जीवनाचे स्वप्न पाहणार्या आकाशचे अवघ्या दोन दिवसातच संसार उध्वस्त झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.