परभणी/पाथरी(Parbhani):- जनावरांच्या संरक्षणासाठी गोठ्यामध्ये झोपण्यास गेलेल्या एका सत्तर वर्षीय व्यक्तींवर मुसळधार पावसाने(Heavy rain) गोठा कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death)झाल्याची घटना तालुक्यातील कानसूर येथे मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे .
जोरदार पाऊस कोसळला या पावसामध्ये हा गोठा पडला असण्याची शक्यता
नारायण सुखदेव सुरवसे ( वय ७० ) असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटने संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मृतक हे नेहमीप्रमाणे संध्याकाळी गावाशेजारील गोठ्यातील जनावरांची देखरेख करण्यासाठी व झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान मंगळवार ११ जून रोजी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान पाथरी तालुक्यातील दक्षिण भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळला या पावसामध्ये हा गोठा पडला असण्याची शक्यता आहे. कोसळलेल्या गोठ्यामध्ये नारायण सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे गाईंचे दूध(Cow’s milk) काढण्यासाठी गेलेल्या त्यांच्या मुलाला सकाळी ६ वाजता हे दृश्य दिसले असता घटना उघडकीस आली. घटनेनंतर कानसुर गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच सज्जाचे तलाठी भदरगे यांनी पाथरी तहसीलदार यांना अहवाल सादर केला असून उशिरापर्यंत या घटने संदर्भात पाथरी पोलिसात नोंद करण्यात आलेली नव्हती .
खेर्डा येथे वीज कोसळून दुभती गाय ठार
सोमवार १० जुन रोजी सायंकाळी पाथरी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला .यावेळी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान तालुक्यातील खेर्डा येथील शेतकरी शरद बाबासाहेब आमले यांच्या दुभत्या गाईवर वीज कोसळल्याने तीचा मृत्यु झाला आहे.