गोंदिया(Gondia):- महाराष्ट्रात ज्या नामवंत ध्येयवादी नेत्याने संपुर्ण जीवन लोकसेवेत घालवले असे लक्ष्मणराव मानकर गुरुजी आज कैलासवासी झाले परंतु त्यांची ओळख आजही जनतेत स्मृतीत आहे. परंतु त्यांच्या निधनाने नंतर पुत्राला लॉटरी लागलेल्या विधानपरिषद सदस्य पर्यंत पोहचूनही त्यांची गरिमा राखता आले नाही. त्यांनी उभारलेली संस्था आज अनेक भ्रष्ट्राचाराने पोखरली आहे. तर त्या गुरुजींच्या नावानेच पुन्हा नवीन संस्था उभारून देणगी वर डल्ला मारण्याचा प्रकार पुढे आले आहे.
पूर्वीच जमीन विक्री घोटाळ्याची मालिका; नंतर नवीन संस्था काढून घोटाळा
लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांनी भवभूती शिक्षण संस्था या नावाने जनतेला शिक्षण प्रेम दिले.त्यांच्या मृत्यू नंतर हीच संस्था पुत्र माजी विधानपरिषद (Legislative Council) सदस्य केशव मानकर यांच्यासाठी लॉटरी लागल्यासारखी ठरली. या संस्थेत कर्मचाऱ्यांना वेठीस धरून नगद रामाचा खेळ मांडला गेला. संस्थेची अनेक जमिनी पूर्वी संस्थेतील कर्मचाऱ्यांना तोंडी व बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केली परंतु त्या जमिनीवर असलेल्या भूखंड मात्र कर्मचाऱ्यांना देण्यात आले नाही, तर जमीन खरेदी करणारे कर्मचारी यांची फसवणूक केली. आता त्या जमिनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने करून त्या जमिनी परस्पर पुन्हा विक्री व्यवहार करून लाखो रुपयांची उचल करण्यात आले. तर अनेक जमिनी सरळ विक्री व्यवहार करून त्यातून लाखो रुपये गोळा करताना माजी आमदार व संस्थेचे सचिव केशव मानकर यांना काही गैर वाटले नाही.
आता प्रशासन घेणार काय दखल ?
या संबधी आता न्यायाधिकरणाने प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले आहे. त्यातच आता सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालय गोंदिया येथे २००६ ला श्री. लक्ष्मणराव मानकर बहुउद्देशीय संस्था आमगाव जिल्हा गोंदिया नोंदनी क्रमानं /महा .७८९/२००६ (भं) वडिलांच्या नावाने या नवीन संस्थेची नोंदनी केशवराव मानकर यांनी केली. यात अनेक नागरिकांशी देणगी व सभासद शुल्क गोळा करण्यात आले. परंतु गोळा करण्यात आलेल्या रकमेचा गोलमाल २ प्रमाणे प्रकरण आता पुढे आले आहे. संस्था नोंदणी करून सुध्दा व लाखो रुपये गोळा करून त्याचे हिशेबच पसार करण्यात आले. संस्थेची रकमेची ऑडिट (Audit करण्यात आले नाही. तर गोळा केलेली रकमेचा हिशेब तर या संस्थेची कधी मासिक अथवा वार्षिक सर्वसाधारण सभा ही घेण्यात आले नाही. या संस्थेत गोळा केलेल्या निधीतून गोंदिया येथे स्वतःच्या नावाने भूखंड खरेदी करण्यात आले होते अशी माहीत आता पुढे आले आहे,ते भूखंड ही परसपर विक्री व्यवहार करून आर्थिक लाभ घेण्यात आले.
नवीन संस्था काढून घोटाळा
यात मोठ्या प्रमाणात मनी लाड्रिंग झाल्याचे समोर येत आहे. हे प्रकरणही आता विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे यात राजकीय संरक्षण घेऊन पळापळ सुरू असल्याची माहिती आहे. तर प्रकरणावर पडदा न घालता प्रशासन काय कार्यवाही करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तर या भ्रष्ट्राचाऱ्याना कोण राजकीय पुढारी संरक्षण देत आहे याचाही शोध घेतला जात असून त्याची कायदेशीर तपासणी घेण्यासाठी दखल घेतली जात आहे.