जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना संतप्त महिलांचे निवेदन
परभणी/जिंतूर (liquor shop Close) : मुंबई नायगाव येथून बामणी येथे देशी दारूचा परवाना स्थलांतर करून बामणी येथे देशी दारू दुकान थाटण्यात आल्याने संतप्त आक्रमक महिलेनी जिल्हाधिकारी,तहसीलदार यांच्या दालनात व्यथा मांडून (liquor shop Close) दुकान बंद करण्याचे निवेदन १७ फेब्रुवारी रोजी देण्यात आले आहे.
जिंतूर तहसील कार्यालयात २५ ते ३० महिलेनी तहसीलदार यांच्या दालनात बसून तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडत अनेक महिलेच्या हस्ताक्षर असलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले कि तालुक्यातील मौजे बामणी गावामध्ये मागील एक महिन्या पासुन नवीन (liquor shop Close) देशी दारुचे दुकान उघडले असुन रस्त्याच्या बाजुला असल्यामुळे आम्हा महिलांना तेथे दारु पिणाऱ्या लोकांचा नाहक त्रास होत आहे.
शेतात जाण्या येण्यासाठी तसेच पाणी भरणे दळण वळण करणे इत्यादी कामे आम्ही महिलांना करावयाचे लागत असल्यामुळे सदरील दुकान रस्त्यावरच असल्यामुळे छेडछाडीचे प्रकार वाढत आहे. तसेच शाळेत जाणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी सुध्दा या (liquor shop Close) दारु पिणाऱ्या लोकांचा नाहक त्रास होत आहे.त्यामुळे हि दुकान त्वरित बंद करावी नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दारू बंदी चा प्रस्ताव पाठवू: तहसीलदार राजेश सरोदे
बामणी येथील महिलेनी आपल्या व्यथा मांडली आहे त्यामुळे ग्रामपंचायत चे ठराव मंजूर करण्यात आले आहे ते व बामणी पोलिस ठाण्याचे एपिआय यांचा अहवाल घेऊन प्रस्ताव करून परभणी येथील (liquor shop Close) स्वतंत्र दारू बंदीचे अधिक्षक साहेब यांच्या कडे प्रस्ताव पाठवू या महिलेने पुर्ण सहकार्य करु.