परभणीतील सेलू शाखेतील प्रकार
न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल
परभणी/सेलू (Credit Society Fraud) : रितसर विड्रॉल फॉर्म भरून रक्कम काढण्यासाठी अर्ज केलेल्या खातेदाराला आरेरावीची भाषा वापरत धमकी देण्यात आली. रक्कम न देता खातेदाराची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ५ जानेवारी २०२४ रोजी सेलू येथील राजस्थानी मल्टि स्टेट क्रेडिट सोसायटी लि.परळी वैजनाथ शाखा सेलू येथे घडला. या (Credit Society Fraud) प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने १० फेब्रुवारी रोजी सेलू पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभय लक्ष्मीकांत सुभेदार यांनी तक्रार दिली आहे. आरोपींनी संगणमत करत मुदत संपल्यानंतर फिर्यादीला रक्कम दिली नाही. रक्कम काढण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस आरेरावीची भाषा वापरून तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीची ४ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादीने न्यायालयात दाद मागीतली. (Credit Society Fraud) न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राजस्थानी मल्टि स्टेट कॉ-अॅप सोसायटी लि. परळी वैजनाथ, चंदूलाल बियाणी, बालचंद लोढा, बद्रीनारायण बहायती, पी.डी.अग्रवाल, विजय लड्डा, नंदकिशोर सोमानी यांच्यावर (Credit Society Fraud) गुन्ह्याची नोंद झाली आहे. तपास पोह जाधव करत आहेत.