परभणी/चारठाणा(Parbhani):- नांदेड संभाजीनगर राज्य महामार्गावरील चारठाणा येथील साहिल धाब्याजवळ हिंगोली तालुक्यातील कनका येथील शिर्डी (shirdi) दर्शनाला गेलेल्या भाविकांचा आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास नांदेड संभाजीनगर राज्य महामार्गावरील चारठाणा जवळील साहिल धाब्याजवळ क्रूझर जीपच्या (Cruiser Jeep) चालक झोपेत असल्याच्या संशय वरून अपघात झाला असावा असे भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जखमी झालेल्या भाविकांना पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठविण्यात आले
या घटनेची माहिती मिळतात चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापूर पोलीस जमदार रामकिशन कोंढरे चालक रविराज वानरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून जखमी झालेल्या भाविकांना पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठविण्यात आले. या अपघातामध्ये (Accident)रुक्मिणी चंदू चांभारे वय 35 वर्ष व दीपक सखाराम जाधव वय 35 वर्ष हे दोघेजण जागी ठार झाले, तर नंदाबाई जाधव वय 35 वर्ष समर प्रभू कोरडे व तेरा वर्ष ऋतुजा अनिल महा नूर वय दहा वर्ष उषा प्रमुख कोरडे वय 35 वर्ष परम चित्रा गण कोरडे वय 40 वर्ष संतोष विठ्ठल जाधव वय 34 कार्तिक परमेश्वर कोरडे वय आठ वर्ष सोनाली अनिल महा नूर व य 25 हे आठ जण जखमी झाले आहे. या जखमीतून तीन जनाची प्रकृती गंभीर असून या सर्व जखमींना परभणी येथील रुग्णालयात (hospital)हलविण्यात आले आहे या क्रुझर जीपमध्ये 17 जण भाविक होते. हा अपघात एवढा विचित्र झाला की सदर क्रुझर जीपने दोन पलट्या खाल्ल्या.