परभणी (Cyber Crime) : सनउत्सव काळात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढते. अशा वेळी (Cyber Crime) सायबर भामटे देखील सक्रीय होतात. मोबाईलवर विविध अमिषाच्या जाहिराती टाकत अनोळखी लिंक उघडण्यास सांगुन त्याव्दारे फसवणुक केल्या जाते. ऑनलाईन व्यवहार करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
मागील काही वर्षात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरबसल्या जीवनावश्यक वस्तु, इलेक्ट्रॉनिक वस्तु मिळत असल्याने ऑनलाईन खरेदी वाढली आहे. बाजारपेठेच्या तुलनेत ऑनलाईन खरेदी करताना वस्तुच्या किंमती कमी असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जाते. सणउत्सवात खरेदीचे प्रमाण वाढते. ही बाब लक्षात घेता ऑनलाईन खरेदीचे विविध पोर्टल वेगवेगळ्या जाहिरातीव्दारे सुट जाहिर करतात. याचाच फायदा आता (Cyber Crime) सायबर प्रâॉड करणार्या भामट्यांनी घेतला आहे. ऑनलाईन खरेदी करताना स्पुफींग, स्कॅम, एपीके फाईल, अनोळखी लिंक पाठवुन फसवणुक केल्या जात आहे.
ऑनलाईन खरेदी करताना होणारी फसवणुक क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड वापरुन तसेच ऑनलाईन शुल्क अदा करत केली जाते. काळानुरुप सायबर भामटे देखील प्रगत झाले आहेत. पूर्वी प्रमाणे ओटीपी टाकला जात नाही. आता एपीके फाईल किंवा अनोळखी लिंक पाठवत मोबाईल हॅग केला जातो. मोबाईलचे संचलन एकदा हातात आले की त्याव्दारे खरेदी करत बँकेचे खाते रिकामे केले जाते. ऑनलाईन प्रâॉडची तक्रार करता येऊ शकते. मात्र खबरदारी हाच योग्य उपाय आहे. ऑनलाईन व्यवहार करताना योग्य खबरदारी घेतल्यास फसवणुक होण्यापासून वाचता येऊ शकते.
स्थानिक व्यापार्यांना द्या प्राधान्य
कमी किंमतीच्या अमिषामुळे ऑनलाईन खरेदी वाढली आहे. याचा परिणाम स्थानिक व्यापारावर होत आहेत. सणउत्सवात खरेदी करत असताना स्थानिक व्यापार्यांना पहिले प्राधान्य द्यावे. जेणे करुन अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होण्यास मदत होईल. यंदाच्या उत्सव काळात स्थानिक व्यापार्यांकडून खरेदीला प्राधान्य द्या.
इंटरनेटच्या युगात ऑनलाईन खरेदीला वेग आला आहे. झटपट खरेदी मध्ये फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
अमिषाला पडू नका बळी
ऑनलाईन वस्तु विक्री करणार्या पोर्टलवर विविध अमिषे दाखविली जातात. वस्तुच्या किमती कमी करुन तसेच विविध ऑफरच्या नावाखाली अमिष दाखवुन खरेदीला भाग पाडले जाते. त्यानंतर ऑनलाईन व्यवहार करत फसवणुक केली जाते. लॉटरी लागल्याचे अमिष दाखवुन तसेच जॅकपॉट व इतर बक्षीसाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
अनोळखी लिंक, एपीके फाईल उघडू नका
सायबर भामट्यांनी एपीके फाईल पाठवुन फसवणुकीचा नवीन फंडा सुरु केला आहे. ऑनलाईन व्यवहार करताना कोणतीही अनोळखी लिंक, एपीके फाईल उघडू नये. फसव्या जाहिरातीवर विश्वास ठेवु नये, भूलथापांना बळी पडू नये, व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्यावी.
– विवेकानंद पाटील, पो.नि. सायबर पोलिस स्टेशन, परभणी