कोरेगाव(Gadchiroli)चोप:- देसाईगंत तालुक्यातील चोप येथिल पाटलीन तलावात आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास संजय शंकर करपते चोप वय 35 याचा मृतदेह (Dead-body)तलावातील सांडात आढळल्याने खळबळ उडाली.
व्यक्तीचा मृतदेह तरंगतांना आढळला
संजय हा सकाळी 8 वाजताच्या सुमारास घरून कुर्हाड घेऊन जंगलात गेला होता. परंतु 11 वाजता पाटलीन तलावाच्या बांधावरून जाणाऱ्यांना तलावात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगतांना आढळला याची माहिती देसाईगंज पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढल्या नंतर संजय शंकर करपते रा. चोप याया असल्याची ओळख पटली. तलावाच्या बाजुला कुर्हाड व अंगातील थंडीची जरकीन ठेवली होती मृत्युचे कारण (Death Reason)कळूसकले नाही देसाईगंज पोलिसांनी मृतदेह शवविच्छदनासाठी (Autopsy) पाठवून मर्ग दाखल केला असुन अधिक चौकशी करीत आहेत. संजयच्या मागे पत्नी, मुलगा, आई असा परिवार आहे. त्याच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्त होत आहे.