परभणी/गंगाखेड(Parbhani):- मुंबई येथे मृतक झालेल्या गंगाखेड तालुक्यातील ढवळकेवाडी येथील विवाहितेचा मृतदेह (dead body) तिच्या नातेवाईकांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात आणत सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल(Filed a case) करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याबाहेर एकच गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विवाहित जोडपं कामानिमित्त मुंबई येथे नालासोपारा परिसरात राहत
याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील ढवळकेवाडी येथील विवाहित जोडपं कामानिमित्त मुंबई (Mumbai) येथे नालासोपारा परिसरात राहत होते. दिनांक २५ मे रोजी पुजा लक्ष्मण राठोड वय २३ वर्ष या विवाहितेने उंदराचे औषध(medicine) खाल्ल्याने तिला उपचारासाठी मुंबई येथीलच रुग्णालयात दाखल केले असता दिनांक ३० मे रोजी उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला. शवविच्छेदन (Autopsy) करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाची नोंद तेथील पोलीस ठाण्यात करण्यात आल्याचे समजले आहे. दिनांक १ जून शनिवार रोजी सकाळी पुजा लक्ष्मण राठोड रा. ढवळकेवाडी तालुका गंगाखेड ह.मु. मुंबई या विवाहितेचा मृतदेह (Deadbody) मुंबई येथील रुग्णवाहिकेतून गंगाखेड येथे येताच विवाहितेचे माहेर पेमा तांडा (उजना) तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील नातेवाईकांनी मृतदेह असलेली रुग्णवाहिका थेट गंगाखेड पोलीस ठाण्यात आणली.
पोलीस ठाण्यासमोर मृत्यु प्रकरणी एकच गर्दी करत विवाहितेच्या
पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर रुग्णवाहिका थांबवून विवाहितेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर एकच गर्दी करत विवाहितेच्या मृत्यु प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. मुंबई येथे घडलेल्या घटनेबाबत गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास पोलीसांनी नकार दिल्याने सुमारे सहा ते सात तास गंगाखेड पोलीस ठाण्यासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास मृतदेह असलेली रुग्णवाहिका नातेवाईकांनी नेली असली तरी या विवाहितेचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला व मुंबई येथील पोलीस ठाण्यात याप्रकरणी कोणता गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
नातेवाईकांची समजूत काढली
गंगाखेड पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारा समोर विवाहितेचा मृतदेह घेवून थांबलेल्या रुग्णवाहिकेसंबंधी पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्याकडे विचारणा केली असता मुंबई येथे घडलेल्या विवाहिता मृत्यूच्या घटनेबाबत तेथील पोलीसांकडून जबाब घेतल्याचे व तेथील पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होत असल्याचे नातेवाईकांना सांगत पोलीस प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढल्याचे पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी दैनिक देशोन्नतीशी(Deshonnati) बोलताना सांगितले.