मानोरा(Washim):- लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. त्याचा निकाल उद्या मंगळवार ४ जून रोजी जाहीर होणार आहे. लोकसभा मतदार संघात एकूण १७ उमेदवार रिंगणात असुन मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये झाल्याचे मतदार राजाकडून ऐकावयास येत आहे.
विद्यमान खासदाराला नांदेड येथील महिला उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले
लोकसभा निवडणुकीत सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर करत प्रचाराला सुरूवात केली होती. इकडे महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यात लागत असलेल्या वेळेमुळे काही दिवस शांतता होती. शेवटी शिवसेनेच्या (shivsena)कोट्यातून विद्यमान खासदाराला डावलून नांदेड येथील महिला उमेदवाराला निवडणूक(elections) रिंगणात उतरविण्यात आले. निवडणुकीपूर्वी यवतमाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांची सभा झाली. निवडणुक प्रचार काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) एक वेळा नव्हे तर दोनदा यवतमाळ व वाशिम जिल्हयात रोड शो व सभेसाठी हजर झाले होते.
महायुती व महा विकास आघाडीत मुख्य लढत
यासह पालकमंत्री संजय राठोड, माजी मंत्री मदन येरावर, आमदार इंद्रनील नाईक, निलय नाईक तर महविकास आघाडीकडून निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुक्काम ठोकत पाच सभा घेतल्या होत्या. निवडणुक नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray), आमदार रोहीत पवार(rohit Pawar), माजी मंत्री माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे आदीसह इतरांनी प्रचाराची धुरा सांभाळली. यासोबतच वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घेत समनक पार्टी, बहुजन समाज पार्टी व अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीचा मैदान गाजवून प्रचार केल्यामुळे त्यांना पडणाऱ्या मतांचा फटका कोणाला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र खरी रंगत महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये आहे. त्यामुळे मशाल पेटणार की बाण विजयी होणार ते आज दुपारपर्यंत कळणार आहे. दरवेळेस जातीय समीकरणावर निवडणूकीत मतदान होते. यावेळी मात्र प्रथमच यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीने पंतप्रधान यांनी केलेल्या विकासाच्या मुद्यावर निवडणुक लढविली तर महाविकास आघाडीने शेतकरी यांचा मुद्दा यासह महागाई यावर निवडणुक लढवत प्रचारात रंगत आणली.