मानोरा (Manora) :- तालुक्यातील आसोला खुर्द येथील वंचित दिव्यांग बांधवांना प्रधानमंत्री आवास योजने (Pradhan Mantri Awas Yojana) अंतर्गत घरकुलाचा लाभ देऊन ग्राम पंचायत मार्फत मिळणारा ५ टक्के निधी त्वरित द्यावा, अन्यथा भर उन्हात विना मंडप आंदोलन करणार असे इशाऱ्याचे निवेदन नायब तहसीलदार मधुकर अष्टुरे यांना दि. १२ मार्च रोजी दिव्यांग बांधवांनी दिले आहे.
ग्राम पंचायत मार्फत ५ टक्के निधी देण्याची मागणी
निवेदनात नमूद केले आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत आमचे नाव नसल्याने आम्हाला घरकुल पासून वंचित राहण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळे पुन्हा सर्व्हेक्षण करून आमचे नाव यादीत समाविष्ट करून घरकुलाचा लाभ द्यावा व ग्राम पंचायत अंतर्गत मिळणारे ५ टक्के निधी २८ मार्च पर्यंत याबाबत न्याय देण्यात यावा. अन्यथा विना मंडप उन्हात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे. निवेदनावर भारत भिमराव जाधव, दत्तराम भावसिंग जाधव, श्रीचंद हिरासिंग राठोड, मनोज गोवर्धन चव्हाण, अरुण रामचंद्र राठोड, निशा भारत जाधव, ललिता विजय चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




