गुरुकुंज/मोझरी (Mozari palanquin pilgrim) : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 56 व्या पुण्यतिथी महोत्सवात आज गोपालकाल्याच्या दिवशी गुरुकुंज आश्रमातील महासमाधी स्थळावर नतमस्तक होऊन ब्रम्हमुहूर्तावर सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम आटोपल्यावर सुरवात होते. (Mozari palanquin pilgrim) गुरुकुंज- मोझरी- दासटेकडी असा तब्बल 6 किलोमीटर चा पल्ला टाळमृदुंगाच्या गजरात श्रीगुरुदेव की जय च्या जयघोषात दरवर्षीप्रमाणे यंदाही काढण्यात आली.
परतीच्या पावसाने महोत्सवादरम्यान लावलेल्या उपस्थितीमुळे अंशता खोळंबा झाला पण तरीही यंदाच्या (Mozari palanquin pilgrim) पालखी पदयात्रेतील गुरुदेव भक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदविल्या गेली.पहाटे 5 वाजतापासून सुरू झालेली पालखी पदयात्रा दुपारी दोन वाजता पर्यंत मार्गक्रमण करीत होती. यंदाच्या पालखी पदयात्रेत 172 पालख्यानी सहभाग घेतला होता अशी नोंद झाली.यावेळी गावकऱ्यांनी पालखी पदयात्रेकरुचे सर्वोत्तम आदरातिथ्य केले.ठिकठिकाणी अल्पोहार,चहापान ,पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
गावातील तरुण युवकांनी यात्रेकरूचा (Mozari palanquin pilgrim) भक्तिमय जल्लोष वाढविण्यासाठी ठीक ठीक चौकाचौकात बारा ठिकाणी सामाजिक प्रभोधनात्मक देखावे निर्माण करण्यात आले होते.त्यातील अनुक्रमे तीन उत्कृष्ट कृतीला ग्रामपंचायत मोझरी कडून रोख प्रोत्साहनपर बक्षीस व शील्ड दरवर्षी देण्यात येते. 18 वर्षापासून ही परंपरा कायम आहे यासंपूर्ण कार्यक्रमाला मोठी लोकवर्गणी करून गावकरी हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करतात. यावर्षी प्रामुख्याने येथील गुरुकृपा सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने 9 क्विंटल तांदळापासून मसाले भात तयार करून अल्पोपहाराच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. त्याचे उत्तम नियोजन गावकऱ्यांनी केले होते.त्याच्या जोडीला गावाच्या सुरवातीपासून गुरुदेव भक्तांसाठी दिल्या जात असलेले सुविधा गुरुकुंज आश्रमात येईपर्यंत गावकरी ठिकठिकाणी मोठ्या श्रद्धेने उपलब्ध करून देतात, हे विशेष…