मानोरा (Washim):- कांरजा-मानोरा विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP)पक्षाकडून ताक ही फुंकुन पीने सुरु आहे. उमेदवारी फायनल नाही. परंतु महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला? हे मात्र अद्याप निश्चित नाही. एक दोन दिवसात महाविकास आघाडीकडून जागा वाटप जाहीर होईल त्याचबरोबर उमेदवारांची नावे सुद्धा जाहीर होतील. भाजपाची उमेदवारी जवळपास माजी आमदार स्व. प्रकाश डहाके यांच्या पत्नीला जाहीर झाल्याची चर्चा आहे.
काँग्रेसच्या वाट्याला उमेदवारी सुटली तर विजय निश्चित
कांरजा – मानोरा विधानसभा हे खुला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेत उ.बा.ठा पक्षाचे उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे यंदा उ.बा.ठा पक्षाकडून इच्छूक उमेदवारांची संख्या वाढली आहे. २०१९ चा इतिहास पाहिला तर सदर जागेवर राष्ट्रवादी कांग्रेस (Nationalist Congress) शरद पवार गट पक्षाने उमेदवार दिला होता. परंतु यंदा काँग्रेस गटाकडून मागणी करीत आहे उमेदवार म्हणून दावा करत आहेत. २०१९ मधे ऐनवेळी कांरजा – मानोरा विधानसभा क्षेत्रातील आनेक नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मदत न करता मागच्या दाराने भाजपच्या उमेदवाराला मदत केली होती निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे भाजप च्या उमेदवाराला यांना बोगस राजपुत भामटा या प्रश्नाचा बंजारा समाजाकडुन झटका मीळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आजही तालुक्यात चर्चा आहे. जर नवखे उमेदवार मेळावे घेणारे आरोग्य शिबिर घेणारे यांना निवडणूक लढवायची होती तर पाच वर्षे कुठे गायब होते?
तालुक्यातील समाज त्यांना मतदान करेल का ?
जर तालुक्यातील बंजारा बांधव बोगस राजपुत भामटा हा मुद्दा लावून धरला तर भाजप उमेदवार यांना बंजारा समाजातील मते मिळणार नाहीत. म्हणजेच महायुतीचा पराभव निश्चित आहे. परंतु जर महाविकास आघाडीकडून खऱ्या प्रामाणीक माणसाला उमेदवारी दिली तर निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. काँग्रेस घटक पक्षाच्या वाट्यावर उमेदवारी सोडली तर मुस्लीम मतदार १०० टक्के मतदान करातील, तालुक्यात एक हाती सत्ता असलेले बि.जे.पी वर्षांतील अंतर्गत वादाने तालुक्याला नकोसे झालेले आहेत. त्याचा फायदा महाविकास आघाडी करून घेईल का? जर महाविकास आघाडीने नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर अप्रत्यक्ष भाजपाला त्याचा फायदा होईल. याचाच अर्थ असा होतो की, महाविकास आघाडीने मागच्या दाराने भाजप उमेदवाराला पाठिंबा देणे. म्हणून येथे मूळ समाजातील नवीन, सुशिक्षित, तरुण, तडफदार उमेदवार चालेल. आणि जिंकेलही. याचा महाविकास आघाडीने सारासार विचार करायला हवा.