परभणी (Parbhani):- आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांची अल्पसंख्यांक शाळेमध्ये निवड झाली होती. सदर शाळेने नजर चुकीने पोर्टलवर नोंदणी केले असल्यचे शिक्षण विभागाला कळविले. त्या नंतर शिक्षण विभागास चुक लक्षात आली आहे. सदर विद्यार्थ्यांचे प्रवेश बदलून देण्यात आले असून त्यांना दुसर्या शाळेत प्रवेश देण्यात आले आहे.
अंतर्गत प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रवेश बदलून दिले
बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २५ टक्के अंतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शहरी भागातील अनम इंग्लिश स्कूल दर्गा रोड या शाळेत चार विद्यार्थ्यांची निवड झाली होती. पालकांनी सदर शाळा शोधली असता, शाळा आढळून आली नाही. सदरची शाळा अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त आहे. या शाळेने नजर चुकीने नोंदणी केले असल्याचे कळविले आहे. अल्पसंख्यांक शाळेची कागदपत्रे सादर केली. त्यानंतर शिक्षण विभागालाही (Department of Education) त्यांची चुक समजून आली. या शाळेत झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश इतर शाळेमध्ये बदलून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या शाळांचे आरटीई (RTE)पोर्टलवरील नोंदणी रद्द करण्यात यावी. जेणेकरून प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश या शाळेत होणार नाहीत. असे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना कळविले आहे. सदर शाळा तिच्या नमूद ठिकाणी नसल्याबाबत पालकांनी पत्र दिले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निवेदन देत सदर शाळा शोधून देण्याविषयी मागणी केली होती.