परभणी/सेलू(Parbhani):- तालुक्यामध्ये मागील चार दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. परिणामी, थंडी गायब झाली आहे. यामुळे हरभरा गहु ज्वारी पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. अळीला रोखण्यासाठी शेतकर्यांकडून कीटकनाशकाची(insect mite) फवारणी केली जात आहे. यामुळे रब्बीतील पिकाच्या खर्चात वाढ होत आहे, तसेच सातत्याने होणार्या वातावरण बदलामुळे रब्बीतील पीकही जातात की काय अशी भीती शेतकर्यांमध्ये आहे. हरभर्यासह रब्बीची इतर पिके धोक्यात आल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
चार दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण
रब्बी पिकांसाठी थंडी लाभदायक असते. परंतु, यंदा थंडीचे प्रमाण कमी आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला काही दिवस थंडीचा कडाका जाणवला होता. परंतु, त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी गायब झाली. यावर्षी खरिपातील ही पीकही जेमतेमच आली होती त्यातच सोयाबीन कापसाला भावही नाही त्यामुळे अगोदरच शेतकरी संकटात सापडलेला असताना आता वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने रब्बीतील हरभरा गहू ज्वारी चे पीकही धोक्यात आले आहे हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच कधी ढगाळ वातावरण, तर कधी थंडी असेच चक्र सुरू आहे.थंडी कमी होताच हरभरा पिकावर आळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.