चिखली (Buldana):- राज्यातील महायुती सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हित जोपासत आहे. पिक कर्जाचे वितरण सिंचन, कृषी मालाला हमीभाव, पिक विमा, शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा, आदी प्रत्येक बाबतीत या सरकारची कामगिरी शेतकऱ्यांना दिलासादायक अशीच राहिली आहे. याउलट काँग्रेस पक्षाचे दहा वर्ष आमदार असलेल्यांनी स्वतःच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची कोणतीही समस्या न सोडवणारे, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही काम न करणारे उलट पक्षी शेतकऱ्यांच्या हक्काची जिल्हा बँक बुडवणारे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये घोटाळा करणारे, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे ढोंगी लोकच आज राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांचा पुळका आल्याचा दाखवत आहेत.
तीन हजार शेतकऱ्यांना केले बॅटरी ऑपरेटेड पंपांचे वितरण
मात्र, काँग्रेसच्या या पूतना मावशीच्या खोट्या कळवळ्याला माझा बळीराजा आता मुळीच फसणार नाही ही मला पक्की शाश्वती आहे. कोणाला काहीही करू द्या; मी मात्र शेतकऱ्याची लेक या नात्याने तुम्हा सर्वांच्या सेवेत सदैव तत्पर असल्याचे भावपूर्ण उद्गार आ. श्वेताताई महाले यांनी काढले. चिखली मतदारसंघातील ३०० शेतकऱ्यांना दि. १८ सप्टेंबर रोजी बॅटरी ऑपरेटेड पंपांचे वितरण रामकृष्ण मोनीबाबा संस्थानमध्ये आयोजित एका भव्य कार्यक्रमात त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आ. महाले बोलत होत्या. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले, भाजपा जिल्हा सरचिटणीस देविदास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. तेजराव नरवाडे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस, चिखली तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, बुलढाणा तालुकाध्यक्ष एड. मोहन पवार, माजी जिल्हा परिषद सदस्या सुनंदाताई शिनगारे, माजी पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, नीताताई सोळंकी, चिखली तालुका कृषी अधिकारी डी बी सवडतकर, बुलढाणा तालुका कृषी अधिकारी डी डी लोखंडे, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथील शास्त्रज्ञ डॉ. संजय उबाळे, प्रवीण देशपांडे यांच्यासह विलास इंगळे शंकर तरमळे यांची मंचावर उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर तेजराव नरवाडे व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस यांनी यावेळी केलेल्या भाषणातून महायुतीच्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देत गरजू व पात्र शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. चिखली तालुका कृषी अधिकारी डी. बी. सवडतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी केले प्रामाणिक प्रयत्न – आ. श्वेताताई महाले
मागील दहा वर्षात काँग्रेस (Congress) पक्षाकडून ज्यांनी चिखली मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मुळीच काळजी नव्हती. कारण, तसे असते तर रस्ता, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा मतदारसंघातील शेतकऱ्यांना यापूर्वीच उपलब्ध झाल्या असत्या. परंतु, त्याची उणीव देखील मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांना भेडसावत होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या सरकारमध्ये मी स्वतः तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून मतदारसंघात सहा वीज उपकेंद्रे मंजूर करून घेतली. मतदारसंघात शेकडो शेत रस्त्यांना मंजुरी मिळवली. याद्वारे शेतकऱ्यांमधील आपसातले वाद मिटवून शेतकऱ्यांना सुविधा करून दिली याशिवाय ८६ नवीन रोहित व ट्रांसफार्मर (transformer) देखील मिळवले. २३ सौर पार्क मतदारसंघासाठी आपण मंजूर करवून घेतले असून त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आता विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही; त्यांना शेतीसाठी २४ तास वीज मिळेल अशी माहिती आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या भाषणातून दिली. अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांच्या आपण शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी महायुतीच्या सरकारचे भक्कम पाठबळ व विकासनिधी मिळत आहे. हा शाश्वत विकास यापुढे देखील चालू राहावा याकरिता राज्यात महायुतीचे सरकार येण्याची नितांत आवश्यकता असून त्यासाठी आपण सर्वजण माझ्यामागे खंबीरपणे उभे राहून पुन्हा एकदा सेवेची संधी द्यावी असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी बोलताना केले.
प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना केले पंपांचे वितरण
या कार्यक्रमात चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली आणि बुलढाणा तालुकातील तीन हजार शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड पंपांचे वितरण पार पडले. आ. श्वेताताई महाले व विद्याधर महाले यांच्या हस्ते यांच्या हस्ते सदाशिव ज्ञानोबा आढाव, वैरागड, रामकृष्ण नामदेव शेजोळ, आंधई, संदीप मोहनसिंह जाधव, हातनी, सागर मधुकर म्हळसने, करतवाडी, दगडूबा यादव घुबे, चिखली, रामेश्वर मदन खरे, गोदरी, इंदुमती पुंजाजी वानखेडे, अमडापूर, कांताबाई सुभाष वरपे, जांब, हरी गंगाराम जाधव, मासरूळ हरिदास लक्ष्मण नेवरे, भोकर, शिवाजी प्रल्हाद कोईगडे, धोत्रा भानगडी आणि प्रदीप शिवलाल पसरटे घाटनांद्रा या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बॅटरी ऑपरेटेड पंपांचे वितरण करण्यात आले. उर्वरित हजारो शेतकऱ्यांना कार्यक्रम स्थळीच पंपांचे वितरण केले गेले.