परभणी (Parbhani crime) :- फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या एका फिल्ड ऑफिसरने (field officer) जमा केलेल्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. २ लाख २१ हजार ६१७ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी संबंधित कर्मचार्यावर १४ मे रोजी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सव्वा दोन लाखाचा केला अपहार परभणीतील मानवत पोलिसात गुन्हा दाखल…!
भारत फायनान्शीयल इन्क्ल्युजन लि. शाखा मानवतचे व्यवस्थापक अंकुश भुरेवाड यांनी तक्रार दिली आहे. फिल्ड ऑफिसर शिवानंद हरी राऊत याने ११ एप्रिल २०२४ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत खातेदार महिलांकडून जमा केलेले कर्जाचे हप्ते व प्री पेमेंट रक्कम अशा एकूण २ लाख २१ हजार ६१७ रुपयांचाी रोकड कॅशिअरकडे जमा न करता त्याचा अपहार केला. सदर प्रकार पुढे आल्यानंतर चौकशी केल्यावर शिवानंद राऊत याच्यावर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. दिगंबर पाटील करत आहेत.