पुसद (Yawatmal):- 1 नोव्हेंबर रोजीच्या रात्री अंदाजे दहा ते साडेदहा वाजता च्या सुमारास वसंतनगर येथील एका तरुणाची धारदार शस्त्राने (weapons) भोसकून हत्या (Murder) केल्याची घटना घडली . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
23 वर्ष या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री अंदाजे दहा ते साडेदहा वाजताच्या दरम्यान वसंतन गर पहिली गल्ली मालानी हॉस्पिटलच्या गल्लीमध्ये करिष्मा हॉटेलच्या समोर चौफुलीवर महेश्वर मंदिराजवळ वसंतनगर येथे राहत असलेल्या विशाल संजय लोखंडे वय अंदाजे 23 वर्ष या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. फिर्यादी संजय गणपत लोखंडे वय 50 वर्ष रा. महेश्वर मंदिर जवळ वसंतनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृतकाने आरोपीस एवढ्या रात्री भर चौकात फटाके का फोडत आहे. असे म्हटले यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. राग अनावर झाल्याने आरोपीने मृतकाच्या पोटावर छातीवर पाठीवर धारदार शस्त्राने(Knife) ने सपासप वार केले. उपस्थित नागरिकांनी तातडीने उपचाराकरिता गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मृतकाला येथील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडण्याच्या वादावरून सदरील दुर्दैवी घटना घडली.
फटाके फोडण्याच्या वादावरून सदरील दुर्दैवी घटना
मृतकाच्या जीवावर फटाक्याचा (Fire Crackers) वाद बेतला.सदर घटनेची माहिती वसंतनगर पोलीस पोलिसांना होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला.मृतक विशाल संजय लोखंडे याच्या मृतदेहास (dead body) शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. घटनास्थळी तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सदर घटनेचा तपास डीवायएसपी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव, सपोनी प्रवीण वेरूळकर, बीट जमदार किसन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन भगत हे करीत आहेत. घटना घडताच घटनास्थळावरून आरोपीने पळ काढला होता. वसंतनगर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा शोध घेत दोन नोव्हेंबरच्या पहाटे पाच वाजता त्याला जेरबंद केले. डीबी पथकाचे अशोक चव्हाण, संजय पवार, मुन्ना आडे यांनी सदरची कारवाई पार पाडली. याप्रकरणी वसंत नगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 495/24 कलम 103(1), बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.