(New Delhi):- राजधानी दिल्लीतील नरेला भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका कारखान्यात भीषण आग (massive fire)लागली आहे. संपूर्ण कारखाना जळत आहे. अग्निशमन दलाच्या (fire brigade) 25 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.30 च्या सुमारास आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा कारखाना नरेला औद्योगिक परिसरात आहे. अद्याप कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
भयानक व्हिडिओ आला समोर
#WATCH | A huge fire broke out in a factory in Delhi's Narela industrial area. Fire tenders reached the spot. Further details awaited. pic.twitter.com/92HrY0Jnl0
— ANI (@ANI) July 24, 2024
आगीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. दिल्ली अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. कारखान्यातून काळ्या धुराचे लोट निघत आहेत. आकाशात ज्वाला दिसत आहेत. कारखान्याच्या वरचे संपूर्ण आकाश काळे झाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यात व्यस्त आहेत. आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यात कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी (loss of life)झाल्याचे वृत्त नाही. या कारखान्यात प्लास्टिकचे दाणे बनवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.