कारंजा(Washim) :- काजळेश्वर ते वाई रस्त्याच्या डांबरीकरण कामात झालेल्या भ्रष्टाचाराची विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) यांच्यामार्फत चौकशी करून संबंधितावर कारवाई (action) करावी या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील लोहारा येथील एका व्यक्तीने २५ जूनपासून आमरण तर दोघांनी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. यातील आमरण उपोषणकर्त्याची २६ जून रोजी रात्री अचानक प्रकृती (nature) बिघडली. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काजळेश्वर ते वाई डांबरीकरण रस्ता व लोहारा येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे(Cement concrete road) नव्याने बांधकाम करण्यात आले असून, या रस्त्याच्या लगत उपोषणकर्त्यांची जमीन आहे. मात्र, या रस्त्याला लागून असलेल्या नालीत मुरुम व दगड पडून आहे. परिणामी, भविष्यात पावसाचे शेतात पाणी साचून पिके खराब होण्याची शक्यता आहे. रस्ता बांधकाम करणाऱ्या मेसर्स प्रभ इंजिनिअर्स (M/s Prabh Engineers) या कंत्राटदाराने व एम.बी. रेकॉर्डीग करणाऱ्या कार्यकारी अभियंत्याने चुकीच्या पध्दतीने अंदाजपत्रक बनवले आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेताच्या लगतच्या नालीतील पडून असलेला मुरुम व दगड भराव काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा. रस्त्याच्या दोन्ही नालीचा उतार गावातील शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थित करून पाण्याचा प्रवाह उताराच्या दिशेने पाऊस पडण्याअगोदर सुरळीत करावा आदी मागण्यांसाठी निलेश प्रल्हाद राठोड २५ जूनपासून बेमुदत आणि सुनिता चव्हाण व किशोर राठोड हे साखळी उपोषणास बसले आहेत. यातील निलेश राठोड यांची डॉक्टरांनी (Doctors) २६ जून रोजी वैद्यकीय तपासणी(Medical examination) केली. ज्यामध्ये त्यांच्या शरीरातील मधुमेहाचे प्रमाण व उच्च रक्तदाब कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.