Nagpur Accident:- शंकर नगर नागपूर येथील सरस्वती हायस्कूल चे विद्यार्थी वर्धा जिल्ह्यातील हरकुल्स या पिकनिक स्पॉट ला भेट देण्यासाठी पाच ट्रॅव्हल्स (Travels) ने सकाळी निघाले होते. सकाळी ९ च्या सुमारास हिंगणी मार्गावर देवळी पेंढरी गावसमोर घाटात सर्वात मागे असलेली ट्रॅव्हल्स वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली.
जखमी एम्स रुग्णालयात दाखल
यात विद्यार्थी व शिक्षक असे ५० पेक्षा जास्त प्रवासी होते. यात अर्ध्यापेक्षा जास्त प्रवाश्यांना मार लागला. एका मुलाचा मृत्यू झाला असून १ शिक्षिका गंभीर जखमी असल्याने त्यांना व जखमींना एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आले आहे.तर किरकोळ जखमीना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.