गोंदिया (Gondia):- गोंदिया जिल्ह्यात 09 सप्टेंबर पासुन मुसळधार पावसाने (Heavy rain) थैमान घातले असुन ढगफुटी सदृश्य पाऊस आल्याने जिल्ह्याभरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील वडेगाव/बंध्या येथे अतिवृष्टिमुळे अनेक घरांची पडझड झालेली आहे. यामध्ये वच्छला जगझापे यांचे राहते घर कोसळले असुन सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. महसूल विभागाने (Department of Revenue) पडझड झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.