परभणी (Parbhani) :- तिन्ही मुली झाल्याने पतीकडून पत्नीला शिवीगाळ (Abusing) आणि मारहाण केल्या जात होती. रागाच्याभरात पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल(Petrol) टाकून तिला पेटवून दिले. ही घटना २६ डिसेंबरच्या रात्री सव्वा आठच्या सुमारास गंगाखेड नाका परिसरात घडली. आगीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू (Death)झाला. पत्नीला जाळून तिचा खून (Murder) केल्या प्रकरणी पतीवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मैना कुंडलिक काळे असे मृतक महिलेचे नाव आहे. या बाबत मृतकाचे बहिण भाग्यश्री काळे हिने पोलिसात तक्रार दिली आहे. मैना काळे हिला तिन्ही मुली झाल्यामुळे तिचा नवरा कुंडलिक उत्तम काळे हा शिवीगाळ करुन मारहाण करत होता. बर्याच वेळा फिर्यादीने त्यांचे भांडण सोडविले होते. २६ डिसेंबरला रात्री कुंडलिक काळे याने मैना काळे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुंडलिक काळे याच्यावर कोतवाली पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच पोनि. संजय ननवरे, पोउपनि. धोत्रे, पोलीस अंमलदार जंगम, मो. गौस, मुरकुटे, ताटीकोंडलवार यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.