अनुसया चा गावात जाऊन केला सत्कार
पुसद (Adv. Ashish Deshmukh) : तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असलेल्या जमिनी ( धुंदी ) येथील अत्यंत सामान्य गोरगरीब प्रसंगी मुळा विकून आपल्या मुलीला शिक्षण देणाऱ्या तुळशीराम देवराव व्यवहारे रुखमाबाई तुळशीराम व्यवहारे यांची मुलगी कु. अनुसया तुळशीराम व्यवहारे यशोगाथेला सन्मानाची भेट देण्यासाठी व तिचा व तिच्या आई-वडिलांचा भावपूर्ण सत्कार करण्यासाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष (Adv. Ashish Deshmukh) ऍड. आशिष देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव ठेंगे, तालुकाध्यक्ष माधवराव वैद्य, ज्येष्ठ समाजसेवक रामराव व्यवहारे, प्रा. सुरेश धनवे, दीपक अवचार, नरेंद्र खंदारे इत्यादींनी तुळशीराम व्यवहारे यांच्या घरी जाऊन ‘कु. अनुसया व्यवहारे’ (Anusaya) हिचा सहकुटुंब भावपूर्ण सत्कार केला.
याप्रसंगी असंख्य गावकरी उपस्थित होते. कु. अनुसया (Anusaya) हिने अत्यंत सर्वसामान्य गोरगरीब प्रसंगी आई-वडील भाऊ यांनी शेतमजुरी करून मोळ्या आपल्या बहिणीला आपल्या मुलीला शिक्षणासाठी पैसा उपलब्ध करून दिला. तर त्या मुलीनेही याची जाण ठेवत खडतर शिक्षणाचे धडे घेत तब्बल आठ परीक्षांमध्ये यशस्वी पणे पास होऊन आई-वडिलांचा व भावांचा विश्वास सार्थकी लावला. तीन वेळा पीएसआय ची परीक्षा पास झाली. तर अनेक ठिकाणी तिची राखीव जागेवर नियुक्ती होऊन तिने उदारमताने जनरल कोट्यातून यश प्राप्त केले. जेणेकरून राखीव जागेवर दुसऱ्या कोणत्याही मुलीला नोकरीची संधी उपलब्ध व्हावी याकरिता तिने जनरल कोट्यातून नोकरी प्राप्त केली. तिची तेल्हारा येथे सध्या महिला व बालकल्याण विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे हे विशेष.