अमरावती (Sanjay Raut) : उभाठा गटाचे प्रवक्ते संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांनी आज पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा अपमानजनक उल्लेख करून त्यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी देण्याच्या विरोधात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि प्रदेश सचिव जयंत डेहणकर यांच्या नेतृत्वात भाजपाने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बडनेऱ्यात भाजपाची तक्रार
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना महाराष्ट्राच्या मातीत “दफन ” करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. शिवाय, पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांचे मा. पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्त्वांच्या विरोधात आहे हे उघड आहे आणि या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. संजय राऊत यांच्या या वक्त्याव्यावरून (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्रजी मोदींसोबत उच्च मंत्री महोदय आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होते. अशा भडकाऊ विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते. आम्ही निवडणूक आयोगाला आणि संबंधित अधिकारी यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे.
तक्रार देतेवेळी भाजपाचे डॉ. वीरेंद्र ढोबळे, राजुभाऊ शर्मा, संजय कटारिया, गजेंद्र भैसे,अन्नू शर्मा, उमेश निलगिरे, नरेश धमाई,टेकचंद केसवानी, संतोष मिश्रा, सूरज जोशी, मनोज पंड्या, अंकुर सिंघई, सुनील लोयबरे,निलेश पवार, अशोक पंचारे, मनीष अग्रवाल, महेश पंचारे, तुषार अंभोरे, अकेंश गुजर, अनूप वांगे, छायाताई अंबाडकर, तृप्ती वाट, सतनाम कौर हुडा, रोशनी वाकळे, पूजा जोशी, अल्काताई भारती प्रामुख्याने उपस्थित होते.