तहसीलदारांनी घेतली अधिकार्यांची बैठक
व्यापारी नागरिकांनीही दिले मागणीचे निवेदन
वसमत (Vasmat Encroachment) : शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे तहसीलदार शारदा दळवी यांनी नगरपालिका व पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन तातडीने हा प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वसमत शहरातील व्यापारी पत्रकार व नागरिकांनी अतिक्रमण हटवण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले त्यामुळे लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.
वसमत शहरात अतिक्रमणाचा (Vasmat Encroachment) कहर झाला आहे. रस्त्यांवर चालता येणे अवघड झाले आहे अशी अवस्था आहे बाजारपेठेत दुकानांच्या ओट्यावर फळ विक्रेते, फुलवाले यांना ओट्यावर जागा किरायाने देण्याचा प्रकार अनेक व्यापार्यांनी केला आहे. त्यामुळे दुकानासमोरील ओटे, ओट्यावर किरायदार त्यासमोर सामानाच्या उतरंड व दोन्ही बाजूला दुचाकीची गर्दी अशी अवस्था असते. त्यातून बाजारपेठेत रहदारीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही भररस्त्यावर हातगाडीवाले, ऑटो, तीन चाकी चारचाकी वाहनांची गर्दी, स्कूलबस, टेम्पो, छोटाहत्ती, सामानांची ने आण करणारे टेम्पो वाळूचे ट्रक याला कोणीही लगाम लावत नाही.
पोलीस ठाणे ते कारंजा चौक या भागात रस्त्याच्या मधोमध व दोन्ही बाजूला (Vasmat Encroachment) अतिक्रमणाचा गराडा आहे चालण्यासाठीही जागा शिल्लक ठेवत नाहीत हात गाडीवाले फळविक्रेते पोट भरण्यासाठी दुकान लावतो असे म्हणतात पण अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता व्यापून टाकतात अशी परिस्थिती आहे. पोलीस ठाणे ते ठक्कर कॉम्प्लेक्स या रस्त्यांवर उपजिल्हा रुग्णालयापासून ते गवळी मारुती मंदिराच्या दोन्ही बाजूला फुटपाथवर दुकाने टाकून किरायाने देण्याचे प्रकार झाले आहेत चालण्यासाठी फुटपाथ शिल्लक नाही व दुकानदार रस्त्यावर सामान ठेवतात मुख्य बाजारपेठेतही अशीच अवस्था आहे. रस्त्याच्या बाहेर दुकानदार सामान ठेवतात दुकानाच्या जागे पेक्षा जास्त जागा रस्त्यावर व्यापली जाते दुकानात जेवढे सामान त्यापेक्षा जास्त सामान रस्त्यावर त्यामुळे रहदारीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही अनेकदा वाहतूक ठप्प होते.
हा प्रकार अति झाल्याने नागरिकांतून तक्रारीचा सूर वाढला आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदार शारदा दळवी यांनी सोमवारी मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे ,यांची बैठक घेतली व वसमत शहरातील अतिक्रमणांचा मुद्दा तातडीने सोडवावा. येत्या दोन दिवसात यावर तोडगा काढण्याचे आदेश तहसीलदारानी अधिकार्यांना दिले आहेत.
दरम्यान, वसमत शहरातील व्यापारी महासंघ पत्रकार व नागरिकांनी मिळून तहसीलदारांना मागणीची निवेदन दिले यात शहरातील अतिक्रमण काढावे, शहरात सीसीटीव्ही बसवावेत यासह अनेक मागण्या केल्या आहेत. मागण्यांची दखल तहसीलदार शारदा दळवी यांनी घेतली असून संबंधितांना योग्य ती कारवाई करण्याचे दिले आहेत.एकंदरीत वसमत शहरातील (Vasmat Encroachment) अतिक्रमणाचा मुद्दा आता ऐरणीवर आलेला दिसत आहे.
येत्या दोन दिवसात मुख्य बाजारपेठेतील रहदारी सुरळीत होईल अशी कारवाई होण्याची शक्यता आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार, सिताराम मॅनेवार, मन्मथअप्पा बेले, राजेंद्र लालपोतू, लक्ष्मीकांत कोसलगे, दीपक कुलथे, वसंत चेपूरवार, रामू चव्हाण, मोईन कादरी, भारत नामपल्ली यांच्यासह व्यापारी, पत्रकार नागरिक महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.