अमरावती (Amravati):- आपल्या दोन मित्रासह अमरावती वरून तिवसा तालुक्यातील भिवापूर येथील तलाव परिसरात फिरण्यासाठी आलेल्या युवकांना तलावात पोहण्याचा मोह झाला. परंतु हाच मोह एका 28 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतला खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अक्षय सुधाकर नसकरी रा. महिंद्र कॉलनी, अमरावती या युवकाचा बुडून मृत्यू (death by drowning)झाला, त्याच्या सोबत दोन मित्र होते. मात्र, त्यांचा जीव वाचला कारण त्यांना पोहता येत होतं.
काल सायंकाळी 5.40 च्या सुमारास एक युवक बुडल्याची माहिती नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना मिळाली असता शोध व बचाव पथक घटनास्थळी सायंकाळी 06.20 सुमारास पोहोचले व तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. रेस्क्यू टीम नि घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. रेस्क्यू टीम (Rescue team) मधील गोताखोर यांनी गळ व हुक च्या साह्याने शोधकार्यला (search function) सुरुवात केली. सायंकाळी 7.00 सुमारास प्रयत्न नंतर अक्षयचा मृतदेह हाती लागला. त्याची ओळख पटली असून तो अक्षय सुधाकर नसकरी राहणार महेंद्र कॉलनी, येथील रहवासी आहे व मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करीता पोलिसांच्या हवाली केला. शोधकार्य पाहण्याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच पोलीस प्रशासनाचे महसूल प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी गर्दी होऊ नये यासाठी तैनात होते.