सिंदेवाही (Chandrapur):- सिंदेवाही येथील जुनी लोणवाही येथील दि.२०/६/२०२४ ला गुरुवारी १२ वाजता महादेव कुमरे रा. जुनी लोणवाही इथे मोठ्या ५ शेंळ्यांना आणि ४ बकर्याना बिबट्याने (Leopard)मारून लाखो रुपयांचा नुकसान केले आहे.
गरीब व्यक्तीला शासनाकडून वनविभागाने मदत मागून द्यावी
वनविभागाने(Forest Department) पंचनामा करून समोरील चौकशी करीता अहवाल पाठवलेला आहे. महत्वाचे म्हणजे पूर्ण शेळ्या (goats) या गाभण होत्या त्यामुळे लाखो रुपेचे नुकसान झाले आहे. राजकीय पुढारी यांनी समोर येऊन त्या गरीब व्यक्तीला योग्य तेवढ्या लवकर मदत मिळवून द्यावी अशी शेळ्या मालकाची विनंती आहे. लोनवाही परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे धुमाकूळ सुरु आहे. मात्र आज चक्क शेळ्यांची शिकार केल्याने बिबट्याचे वास्त्यव लोणवहीत आहे हे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता तरी वनविभाग अधिकारी याकडे लक्ष्य देतील काय असे संक्षिप्त प्रश्न लोणवाही मधील नागरिक करीत आहे. तसेच लवकरात लवकर त्या गरीब व्यक्तीला शासनाकडून वनविभागाने मदत मागून द्यावे अशी समस्त लोणवही मधील नागरिकांकडून मागणी आहे.