परभणी(Parbhani) :- कमी दामात सोन्याचे शिक्के देण्याचे अमिष सराफा व्यापार्याला चांगलेच महागात पडले. भामट्यांनी सराफा व्यापारी व त्यांच्या मित्राची फसवणूक (Fraud) करत दहा लाख रुपये रोख आणि ४५ हजार रुपये किमतीचे मोबाईल काढून घेतले. ही घटना ८ जानेवारी रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास बोरी ते वाघी रोडवर घडली. सदर प्रकरणी रात्री उशीरा बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला.
परभणीतील बोरी ते वाघी रोडवरील घटना आरोपींवर गुन्हा दाखल
मारोती कृष्णा कोळेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी संगणमत करत सोन्याचे शिक्के कमी दामात देतो, असे म्हणत विश्वास संपादन केला. फिर्यादीला बोरी ते वाघी रोडवर बोलावले. या ठिकाणी आरोपींनी फिर्यादी जवळील ४० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, फिर्यादीच्या मित्रा जवळील ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि त्यांच्या पिशवीतील दहा लाख रुपये घेतले. सोन्याचे शिक्के न देता आर्थिक फसवणूक केली. शिक्क्या बाबत विचारणा केल्यावर थापडबुक्क्यांनी मारहाण करत आरोपी पसार झाले. या प्रकरणी अजय धनराज भालेराव, विठ्ठल राम ससाणे, विनोद शेषराव डांगे, कालू पारधी व इतर तीन अनोळखी इसम आणि एक महिला यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. तपास पोउपनि. सोनवणे करत आहेत.