परभणी/पूर्णा (Parbhani):- सत्तेची पोळी भाजण्यासाठी जाती-जातीत व धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचे काम भाजपा व महायुतीने केले आहे. यापासून सर्व जनतेने सावध राहून येणार्या काळात महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांनाच विजयी करा असे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले.
परभणीच्या पूर्णेत पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्याला प्रतिसाद
पूर्णा येथे सुमन मंगल कार्यालयात सोमवारी शिवसेना (shivsena)ठाकरे गटाचे उपनेते खासदार संजय उर्फ बंडु जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खा.जाधव बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार विशाल कदम, माजी सभापती बालाजी देसाई, मारोती बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) रितेश काळे, माजी नगराध्यक्ष संतोष एकलारे, जाकीर कुरेशी, उपजिप्र.दशरथ भोसले, तालुकाध्यक्ष शहाजी देसाई, काँग्रेसचे प्रल्हाद पारवे, संदीप ढगे, ता.प्र.काशिनाथ काळबांडे, सभापती बालाजी खैरे, सभापती अशोक बोकारे, उप सभापती नारायण पिसाळ, काँग्रेस शहराध्यक्ष शेख अहमद, शाम कदम, अय्युब कुरेशी, गोपाळ अंभोरे, शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, बंडूआप्पा बनसोडे, शेख खुद्दुस शेख बशीर, व्यंकटराव पौळ, अमजद नुरी, बालाजी वैद्य, आदी उपस्थित होते. प्रारंभी टि पॉईंट पासून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. संदीप ढगे व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
तसेच संदीप ढगे, इलियास पठाण, फेरोज पठाण आदी प्रमुख पदाधिकार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेला सामान्य जनतेतील लोकप्रतिनिधी हवा आहे त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार असून शेतकर्याचा पोरगा विधानसभेत जाणार आहे अशा भावना संदीप ढगे यांनी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन जगन्नाथ कदम व अॅड. राजेश भालेराव यांनी केले. अशोक वाघमारे यांनी आभार मानले.