परभणी/गंगाखेड(Parbhani):- जेवणाचा बहाणा करून परळी रस्त्यावर असलेल्या शहराबाहेरील एका हॉटेलच्या बाजूस फ्लॉटिंगच्या मोकळ्या जागेत नेऊन विवाहितेच्या अंगाशी झोंबाझोंबी करून विनयभंग (molestation) करत चाकूने पोटावर मारल्याची घटना दि. ९ सप्टेंबर सोमवार रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.
हातातील चाकु फिर्यादीच्या पोटावर मारुन केले जखमी
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील एका २४ वर्षीय विवाहितेस महेश ज्ञानोबा डांगे व त्याचा मित्र अरुण दोघे रा. गंगाखेड यांनी दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास संगनमत करून जेवणाचा बहाणा करत विवाहितेस गंगाखेड ते परळी रस्त्यावरील एका हॉटेल शेजारील मोकळ्या फ्लॉटिंगमध्ये नेऊन बळजबरीने तिच्या अंगाला झोंबाझोबी केली. विवाहितेने यास विरोध केला असता महेश डांगे याने त्याचे हातातील चाकु फिर्यादीच्या पोटावर मारुन जखमी केले व महेश डांगे तसेच त्याचा मित्र अरुण या दोघांनी विवाहितेच्या तोंडावर मुक्का मार मारला. सदर घटना कोणाला सांगशील तर तुझ्या मुलाला खतम करतो अशी धमकी ही महेश डांगे याने दिल्याची फिर्याद रुग्णालयात (hospital)उपचार घेणाऱ्या विवाहितेने दिल्यावरुन दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती समजताच पो. नि. दिपककुमार वाघमारे, पोउपनि विशाल बुधोडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत महेश डांगे यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. याचा पुढील तपास पो.नि. दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. मुंजाभाऊ वाघमारे हे करीत आहेत.