परभणी (Parbhani):- परभणी शहरातील मागील पाच वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या रस्त्यांच्या कामांना अखेर सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमधील बांधकाम मंत्री (Minister of Construction)अशोक चव्हाण यांच्या हस्ते या कामांचे भूमिपुजन झाले होते. तद्नंतर सरकार बदलल्यावर शेवटच्या टप्यामध्ये रस्त्यांच्या कामास सुरूवात झालेली आहे.
रस्त्यांच्या बांधकामाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे
शहरात एकूण १८ ते १९ किलोमिटर लांबी असलेले ४ रस्त्यांच्या कामास व त्यासोबतच रस्त्यालगत असलेल्या नालींचे देखील बांधकाम कामास सुरूवात झालेली आहे. महानगर पालिकेच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या बांधकामाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (Public Works Department) वर्ग झाले होते. या बांधकामात धाररोड ते मरीआई मंदिर पर्यंत सिमेंट रस्ता, मरीआई मंदिर ते देशमुख हॉटेल ते उघडा महादेव मंदिर ते ३३ केव्ही एमएसईबी झोन -५ कार्यालय पर्यंत डांबरी रस्ता. सामान्य जिल्हा रूग्णालय (District Hospital) ते एन.एच.६१ या राष्ट्रीय महामार्ग ते दर्गा कमान पर्यंत सिमेंट रोड. अनुसया टॉकीज ते गंगाखेड नाका रेल्वे गेट १ ते परळी रेल्वे गेट – २ पर्यंत सिमेंट रोड, जुना पेडगाव रोड ते महाराणा प्रताप चौक ते खंडोबा बाजार पर्यंत डांबरी रोड या सर्व रस्त्यांचे कामास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा काढण्यात आल्या होत्या. या कामाचे कंत्राट गुजरात येथील खाजगी कंपनीला मिळाले आहे. या कामाची अंदाजीत किंमत जवळपास ७० करोड रूपये असून ही कामे एका वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण होण्याचा अंदाज आहे. तरी काही ठिकाणी नाल्यांसदर्भात अडचणी असल्यामुळे थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो. या रस्त्यांमुळे परभणीकरांचा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल का ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहतो.
कंत्राट जरी गुजरात येथील खाजगी कंपनीला दिले असले तरीही देखील स्थानिक कंत्राटी अभियंत्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या उत्तम सहकार्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल. अन्यथा पून्हा जशास तसे रस्ते राहिल्यास परभणीकरांसारखे दुर्दैवी परभणीकरच राहतील. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण लक्ष या रस्त्याकडे राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पर्यायी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
शहरात मुख्य रस्त्याचे काम झाले असून दर्गा रोडचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे मात्र जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली तरीही रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्ता अर्जुन काही बदला नसून त्या रस्त्यावरून गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्स ला व रुग्णांना रहिवाशांना या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे दर्गा रोडला जोडणारा हा पर्यायी रस्ता सध्या रहिवाशी वापरत असून तात्पुरता स्वरूपात काय होईना या रस्त्याची डागडूजी करून देण्यात यावी अशी मागणी दर्गा रोड रहिवाश कडून होत आहे