परभणी (Parbhani):- हनुमान जवंजाळ यांने गळफास घेऊन आत्महत्या करण्यामागे अवैध सावकारी करणारे व्यक्ती असल्याची चर्चा होती. तपास बरोबर होत नसल्याची तक्रार(complaint) पोलीस अधीक्षक परदेशी यांच्याकडे केल्यानंतर तपासाचे चक्र फिरले त्यानंतर काही पुरावे समोर आल्यावर आत्महत्यास प्रवृत्त करणार्या शुभम बोबडे व इतर तिघांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन जनावर गुन्हा दाखल
२२ मार्च रोजी माऊली नगर परभणी येथील हनुमान जवंजाळ याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केल्याप्रकरणी नोंद करण्यात आली या आत्महत्या मागे अवैध सावकारी प्रकरण असल्याची चर्चा होती हनुमानचे वडील भगवान जवंजाळ यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात(Police station) तपास योग्य दिशेने करा अशी मागणी केली. संबंधित तपासी पोलीस अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केले. काही पुरावे पोलिसांना दिल्यानंतरही आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. भगवान जवंजाळ यांनी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांची भेट घेऊन योग्य तपासाची मागणी केली पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेत तपासाचे आदेश दिले त्यानंतर हनुमान यांच्या आत्महत्या मागे अवैध सावकारी मुळे ही घटना घडल्याचे समोर आले ३६ हजारासाठी हनुमानला शुभम बोबडे त्याचा भाऊ व इतर दोघांनी पकडून ठेवले होते हे तपासात समोर आले. त्यानंतर भगवान जेवण झाल. यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध कलम ३०६ ३४ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पद्धतीने आत्महत्या चा तपास झाल्यास अनेक बाबी समोर येतील असे चित्र परभणी शहराचे आहे.
माझे नाव घेतले का ? आरोपीने केला फोन
व्याज व्यवहारात हनुमानने आत्महत्या केल्यानंतर आरोपीने इतरांना फोन करून संबंधीताने आत्महत्या करून माझे नाव घेतले आहे का ? त्याच्या खिश्यात माझ्या नावाची चिट्टी सापडली आहे का ? अशी विचारणा केली. आरोपीने फोन करून या बाबत चौकशी केली.
अवैध सावकारीत अडकली तरुणाई
अवैध सावकारीच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अव्वाच्या सव्वा दराणे व्याजाने रकमा दिल्या जात आहेत. कर्ज देणारे व्यक्ती धमक्या देत आहेत. बदनामीला घाबरून तक्रार केल्या जात नसल्याचे दिसत आहे. यामुळेच अवैध सावकरी करणार्यांचे मनोबल वाढले आहे.