मानोरा (Washim):- तालुक्यातील कोडोली गावचे सुपुत्र अमोल पाटणकर यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री(Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांचे ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) म्हणून नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त ओएसडी यांनी मुख्यमंत्री यांची मंत्रालयात भेट घेऊन आभार मानले.
यापूर्वी उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस आरूढ असताना सुध्दा अमोल पाटणकर हे त्यांचे ओएसडी म्हणून नियुक्त होते. त्यावेळी पाटणकर यांनी संपूर्ण जिल्हयातील विविध विकास कामे मार्गी लावली होती. त्यांची पुन्हा मुख्यमंत्री यांचे ओएसडी (OSD) पदी नियुक्ती झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.