भंडारा (Bhandara):- शहरात गत दिड-दोन वर्षापासून जल-जीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा (Water supply) योजनेच्या पाईप लाईन योजनेचे काम सुरु आहे. या कामामुळे शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था होऊन याचा फटका शहरवासियांना बसत आहे.
कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात
शहरातील खात रोड वरील यशोदा नगर परिसरात मोठ्या पाईप लाईनचे (Pipe line) काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. मात्र दोन पाईप व्यवस्थित जोडले गेले नसल्याने नवनिर्मित पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाहून गेले. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाईप लाईन फुटल्याची माहिती स्थानिक प्रशासनाना माहित होताच फुटलेल्या पाईप लाईनची दुरुस्ती करण्यात आली.