चिखली (Buldhana) :- मागील पंचवार्षिकच्या तुलनेत यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीत 24 इच्छुक उमेदवार निवणूक लढविणार आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाला 317 बुधवर दोन बॅलेट युनिट (Ballet Unit) राहणार असल्याचे सांगण्यात आले.
317 बुधवर प्रत्येकी 2 बॅलेट युनिट मशीन राहणार
बुलढाणा जिल्ह्यात सर्वात मोठा चिखली मतदार संघ आहे. त्यामुळे प्रत्येक पंचवार्षिक मध्ये निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या बळ जास्त असते. आणि आता निवडणूक आयोगाच्या (Election Commission) माहितीनुसार एका बॅलेट युनिट वर 16 उमेदवारच असतात परंतु यावर्षी चिखली विधानसभेमध्ये एकूण 24 इच्छुक उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे 317 बुधवर प्रत्येकी 2 बॅलेट युनिट मशीन राहणार आहेत. त्यामध्ये एका बुधवर 5 कर्मचारी असे एकूण 1585 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या 317 बुधवर 3 लाख 7 शे अठरा असे मतदार मतदान करणार असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पोळ तसेच तहसीलदार संतोष काकडे यांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. असे दैनिक देशोन्नती शी सांगण्यात आले.