सामान्य नागरिकांसाठी पायी चालण्यासाठी असणाऱ्या फूटपाथवर ट्रकांचे अतिक्रमण
पुसद (Pusad-Washim road) : पुसद ते वाशिम रस्ता हा गेल्या काही दिवसा अगोदर जागतिक बँकेच्या सामाजिक अर्थसहाय्यतेतून निर्माण झालेला आहे. एका मोठ्या कंत्राटदाराने अतिशय वेगाने या रस्त्याचे काम केले. सामाजिक अर्थसाहेतेतून निर्माण झालेला हा रस्ता अत्यंत उत्कृष्ट असेल असे नागरिकांना वाटले होते.
पुसद ते वाशिम (Pusad-Washim road) हे अवघे सध्या अर्धा तासांमध्ये जाता येते. मात्र अनेक ठिकाणी कंत्राटदाराच्या काही लोकांनी ॲडजस्टमेंट करत इस्टिमेटला बाजूला ठेवून कामे केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय कृषी कार्यालय यादरम्यान या रस्त्यावर नागरिकांसाठी पायी चालण्यासाठी फुटपाथ निर्माण केला गेला आहे. नागरिकांना रस्त्यावरील वाहनांचा त्रास होऊ नये या उद्देशाने.
मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे फूटपाथ दोन्ही बाजूने मालवाहू ट्रक वाल्यांनी आपले ट्रक उभे करून काबीज केलेला आहे. वास्तविकता प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे कळायला पाहिजे नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या या गुन्हेगारांविरुद्ध पोलीस फिर्याद होणे गरजेचे आहे त्यावेळेस नागरिकांसाठी फुटपाथ मोकळे राहतील एवढे खरे.