Ujjain:- नुकतेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथे फूटपाथवर एका महिलेवर सार्वजनिकरित्या बलात्कार (rape)केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर (social Media)अपलोड करण्यात आला आहे. आता पोलिसांनी बलात्काराचा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.आरोपीचे नाव 42 वर्षीय मोहम्मद सलीम असे आहे. तो ऑटोचालक म्हणून काम करतो.
प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल
उज्जैनचे पोलिस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी 7 सप्टेंबर रोजी सांगितले की, ही घटना उघडकीस आल्यानंतर, घटनेचा व्हिडिओ कोणी बनवला आणि तो व्हायरल केला, याचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस, सायबर आणि सोशल मीडिया टीम तैनात करण्यात आली. त्याने सांगितले की, काही तासांतच टीमने व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे यापूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्डही समोर आले आहे. आरोपीची चौकशी करण्यासोबतच त्याच्या मोबाईल फोनचीही तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी सलीमविरुद्ध बीएनएस कलम ७२, ७७, २९४, कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आयटी कायदा आणि महिला दंड संहितेच्या कलम 67 नुसार अशोभनीय प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उज्जैनमध्ये फूटपाथवर महिलेवर खुलेआम बलात्कार, घटनेवरून उग्र राजकारण
कोयला फाट्याजवळील परिसरात बलात्काराची घटना घडली आहे. पीडित महिला तेथे कचरा वेचण्याचे काम करत होती. 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास 28 वर्षीय आरोपी मुलाने महिलेला दारू पाजली आणि त्यानंतर फूटपाथवर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. आश्चर्य म्हणजे हे कृत्य थांबवण्याऐवजी तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. या प्रकरणावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. उज्जैनच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काँग्रेसने भाजपवर प्रश्न उपस्थित केले असता, काँग्रेस या घटनेचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.