चंद्रपूर (Chandrapur):- बल्लारपुर पोलीसांना (Police)आज दि.२६/०८/२०२४ चे दुपारी १५.३० वा. चे सुमारास मुखबिरने माहिती दिली की, राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपुर येथे राहणारी शमशाद रिजवान शेख हिचे घराची अंमली पदार्थ (Narcotics) बाळगुण असुन ती गांजाची अवैध (invalid) विक्री करित आहे. त्या अनुषंगाने दोन शासकीय पंच, फोटोग्रॉफर, व्यवसायीक यांना पोलीस ठाणे बल्लारपुर येथे बोलावुन सदर खबरेबाबत थोडक्यात माहिती देवुन मुखबिरने सांगितल्याप्रमाणे घटनास्थळावर रवाना होवुन नमुद महिलेच्या घराची झडती घेतली असता. तिचे घरातुन अंमली पदार्थ (गांजा) मिळुन आला. कि. अं.८०,०००/-रु. एका अब्बा हुजुर असे लिहलेल्या प्लॉस्टीक चुंगडीत ओलसर हिरवट रंगाचा (गांजा) ज्याचे वजन ८.०३५ किलो ग्रॅम असा असलेला प्रत्येकी किलो कि.अं. १०,००० /- रु. प्रमाणे असा एकुण कि.अं.८०,०००/- रु. मुदेदेमाल मिळुन आल्याने आरोपीत महिला नामे- शमशाद रिजवान शेख वय ३५ वर्षे रा. के. जी. एन. चौक, राजेंद्र प्रसाद वार्ड, बल्लारपुर जि. चंद्रपुर हिला ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रत्येकी किलो कि.अं. १०,००० /- रु. प्रमाणे असा एकुण कि.अं.८०,०००/- रु. मुदेदेमाल
तसेच तिला गांजा आणुन देणारी महिला नामे बदकम्मा ऊर्फ बदकी नुनावत रा. ह. मु. वरंगल राज्य- आंधप्रदेश, मुळ पत्ता- शिवनगर वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर हिचा शोध पोलीस घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, दिपक साखरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो. नि. सुनिल वि. गाडे, पोउपनि हुसेन शहा, मपोउपनि वर्षा नैताम, सफौ. गजानन डोईफोडे, सफौ. वामन शेंडे, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. रणविजय ठाकुर, बाबा नैताम, मपोहवा. अनिता मोहुर्ले, शरदचंद्र कारुष, विकास जुमनाके, शेखर माथनकर, प्रकाश मडावी, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं. कल्याणी पाटील, विना येलपुलवार इ. स्टॉफ यांनी केली आहे.