चिखली (Buldhana):- सोयाबीनला ७ हजार रुपये भाव, थकलेला पिक विमा, शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन अनुदानाचा अनुशेष, शेतकऱ्यांना दिवसा सलग १२ तास वीज, वन्य प्राण्यांपासून संरक्षण या मागण्यांसाठी चिखली विधानसभा मतदारसंघातील (Assembly constituencies) चार हजार शेतकऱ्यांचे रक्ताचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांचा नेतृत्वात बुधवार १८ सप्टेंबर रोजी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. तर शुक्रवार १९ सप्टेंबरला जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना स्वत: सह अडीच हजार शेतकऱ्यांचे रक्ताचे निवेदन देण्यासाठी राहुल भाऊ बोंद्रे व जिल्हा काँग्रेस (Congress)पदाधिकारी आले असता पोलिस प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या रक्ताचे निवदेन फाडण्यात आले. त्यानंतर त्यांना शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. या हुकमशाही कृत्याविरोधात आक्रमक होत राहुल भाऊ बोंद्रे यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल. शेतकऱ्यांचा रक्ताचा अपमान करणाऱ्या या हुकुमाशाही महायुती सरकारला शेतकरी धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा एल्गार फुकारला.
निवेदन फाडण्याच्या हुकमाशाहीकृती विरुध्द राहुलभाऊ बोंद्रे यांचा एल्गार..
शेतकऱ्यांच्या रक्ताचे निवेदन देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला होता. शांततामय व सनदशीर मार्गाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी राहुल भाऊ बोंद्रे बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात आले असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना पोलीस प्रशसानाडून अडवण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी व त्यांच्या सहकार्यांनी त्यांना अडवून शेतकऱ्यांच्या रक्ताचे निवेदन फाडले. यानंतर राहुल भाऊ बोंद्रे यांनी निवेदन फाडण्याच्या हुकमाशाहीकृती विरुध्द पोलीस प्रशासन व महायुती सरकारचा निषेध नोंदवला. शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान महामुती सरकारला भोगवा लागणार असून हुकुमाशीहीचा अंत जवळ आल्याचे सांगून आगामी विधानसभा निवडणूकीत लोकशाहीचा विजय होईल, असा विश्वास राहुल भाऊ बोंद्रे यांनी व्यक्त केला. यावेळी संजय राठोड, जयश्रीताई शेकळे, दत्ता काकस यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार : राहुल भाऊ बोंद्रे
ज्या रक्ताचे पाणी करून शेतकरी जगाला जगवतो, त्याच रक्ताची शाई करून लिहिलेले हे शेतकऱ्यांच्या हक्काचे निवेदन होते. आम्हाला केवळ मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे होते. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत, आम्ही त्यांना भेटायचे नाही तर कुणाला भेटायचे? आम्ही सोयाबीन – कापसाला भाव मागत होतो, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती मागत होतो, असे राहुल बोंद्रे म्हणाले. शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार होतो मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पुढे केले. रक्ताने लिहिलेले निवेदन फाडले.. मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या या रक्ताची शपथ घेवून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे राहुल भाऊ बोंद्रे यांनी सांगितले.