हिंगोली(Hingoli):- विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर जिल्ह्यात पोलिसांनी पावणे तीन लाख रूपयाची हातभट्टी, देशी-विदेशी दारूसाठा जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.
विदेशी दारूचा पावणे तीन लाखांचा साठ हजाराचा दारू साठा जप्त
नांदेड परीक्षेत्रात विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली मासरेडचे आयोजन करण्यात आहे. या निमित्ताने १० नोव्हेंबरला जिल्हाभरात ही कारवाई (action) करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. औंढा नागनाथ तालुक्यातील लोहरा खु. येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण नागरे यांनी मारलेल्या छाप्यात सुभाष कान्हा राठोड याच्याकडून ८५०० रूपयाचे सडके रसायन, ८४०० रूपयाची गावठी हातभट्टी दारू असा एकूण १६९०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे स्थानिक गुन्हे शाखेचे लिंबाजी वाव्हळे यांनी मारलेल्या छाप्यात शरद साहेबराव पवार याच्याकडून २५०० रूपयाची २५ लिटर गावठी दारू, १४ हजार रूपयाचे हातभट्टी काढण्याचे सडके रसायन असा एकूण १६५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
छाप्यात १४५० रूपयाच्या २९ देशी दारूच्या बाटल्या जप्त
सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथे पोलीस उपनिरीक्षक मारोती सोनकांबळे यांनी मारलेल्या छाप्यात रामदास धोंडूजी वाठोरे याच्याकडून ४२० रूपयाच्या १२ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या, सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा येथे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी मारलेल्या छाप्यात सिद्धार्थ मुंजाजी जाधव याच्याकडून १४७० रूपयाच्या २१ देशी दारूच्या (country liquor)बाटल्या व १२८० रूपयाच्या मॅगडॉल नंबर १ च्या ८ बाटल्या असा एकूण २७५० रूपयाचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त केला. वाढोणा गावात जाणाऱ्या रस्त्यालगत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे यांनी मारलेल्या छाप्यात २ हजार रूपयाची २० लिटर गावठी हातभट्टी दारू, १० हजार रूपयाचे सडके रसायन असा एकूण १२ हजाराचा मुद्देमाल कलाबाई ज्ञानू पवार या महिलेकडून जप्त केलाः परंतु पोलिसांना तिने दुरूनच पाहून पलायन केले. वसमत तालुक्यातील आरळ येथील मराठवाडा ढाब्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी मारलेल्या छाप्यात हनुमान उत्तमराव राखोंडे याच्याकडून १४४० रूपयाच्या १८ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
छापा सत्रामुळे दारू विक्रेत्यांची पळापळ
सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक धारगे यांनी मारलेल्या छाप्यात गौतम नामदेव ठोके याच्याकडून एका बॉक्समधील २१०० रूपयाच्या ३० देशी दारूच्या बाटल्या जप्त ह केल्या. वसमत तालुक्यातील खांडेगाव येथे संदीप चव्हाण यांनी मारलेल्या छाप्यात गंगाधर जम प्रल्हाद गायकवाड याच्याकहन ३१५० मा रूपयाच्या ४५ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथे हरीभाऊ गुंजकर यांनी मारलेल्या छाप्यात सुरेश गोविंदा कांबळे याच्याकडून १४५० रूपयाच्या २९ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या, रामेश्वर तांडा येथील गायरान जमिनीवर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर नागरे यांनी मारलेल्या छाप्यात प्रदीप नागोराव चव्हाण रा. रामेश्वर तांडा याच्याकडून १२ हजार रूपयाची २० लिटर गावठी हातभट्टी दारू, ३० हजार रूपयाचे ३०० लिटर सडके रसायन असा एकूण ३२ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीमुळे पोलिसांचे जिल्ह्यात छापासत्र
तसेच याच ठिकाणी पिराजी बेले यांनी मारलेल्या छाप्यात हरीशचंद्र तुकाराम जाधव याच्याकडून ३ हजार रूपयाची हातभट्टी दारू, २५ हजाराचे सडके रसायन, १४०० रूपयाचे यूरियाचे पोते, १ हजार रूपयाची गुळाची ढेप, ३ हजाराचे मोहफुल असा एकूण ३३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला; परंतु पोलिसांना पाहून त्याने माळरानात पलायन केले. १० नोव्हेंबरला पोलिसांनी जिल्ह्यात २४ गुन्हे दाखल केले. ज्यामध्ये २६ दारू विक्रेत्यांकडून ३८९ लिटर हातभट्टी दारू, १९८७ लिटर दारूचे रसायन, ६४२ देशी दारूच्या बाटल्या असा एकूण ३ लाख ७५ हजार ८६० रूपयाचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला.