मजूर बाहेरगावी स्थलांतर
परभणी/सोनपेठ (Sonpeth taluka) : तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या उमेदीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन साल गडी ठेवून संपूर्ण वर्षभराचे नियोजन केले जाते. मात्र सालगड्याचे भाव सव्वा लाख रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहे. (Sonpeth taluka) ऐवढं करूनही सालगडी मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सोनपेठ तालुक्यातील (Sonpeth taluka) शेळगाव, आवलगाव ,वडगाव ,लासीना, गंगापिंपरी ,थडीउक्कडगाव, नरवाडी, विटा, दुधगाव, वाणीसंगम,लोहीग्राम ,डिघोळ धामोनी यांसह संपूर्ण तालुक्यांत शेतीच्या कामासाठी सालगडी ठेवायची जुनी परंपरा आहे. गुढीपाडवा अवघ्या सहा ते सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याअनुषंगाने सालगडी ठेवायची नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील सर्व अर्थकारण हे प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून असुन शेतात वर्षभर काम करण्यासाठी सालगडी मुख्य घटक आहे. जुन्या रुढी परंपरेनुसार सालगडी यांना अन्नधान्य स्वरूपाचा मोबदला दिला जायचा.
परंतु कालांतराने त्यात बदल होऊन रोख पैसाची मागणी होऊ लागली आहे. तेव्हापासुन ते आजपर्यंत पैशांच्या स्वरूपात सालगडी ठेवले जाऊ लागले आहेत. दि.३० मार्च रोजी गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. त्याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. (Sonpeth taluka) गुढीपाडव्याच्या निमित्ताने सालगड्यांचा शोध घेतला जात आहे. साल गड्यांच्या विविध मागण्या शेतकऱ्यांसमोर येत आहे. यामध्ये नगदी सव्वा लाख ते दिड लाख रुपयांच्या पर्यंत सालगडी भाव पोहोचले आहे. सालगड्यांची मनधरणी करून देखील सालगडी मिळत नसल्याचे चित्र आहे.
यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे मुश्किल झाले आहे. यामध्ये (Sonpeth taluka) सालगडी रोख रक्कम व वर्षेभर पुरेल एवढे अन्नधान्य तसेच वर्षातुन नवीन ड्रेस द्यावे लागणार आहे. या सर्व अटी मान्य करून देखील सालगडी मिळत नसल्यामुळे बाहेर जिल्ह्यातील सालगडी आनावे लागत आहे. सद्या मजुरांचे मुंबई, पुणे,नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, यांसह अन्य बाहेर गावी स्थलांतर झाले असल्याने मजूरांची चणचण भासत आहे त्यात सालगडी भाव गगनाला भिडले असल्याने शेतकरी हतबल झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे….!