बुलढाणा(Buldhana):- नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्रालयात(Central Ministries) जाऊन आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा पदभार ना. प्रतापराव जाधव यांनी स्वीकारला. राज्यमंत्री म्हणून या तिन्ही मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी नामदार जाधव यांच्याकडे दिला आहे. यावेळी संबंधित विभागाचे सचिव तथा प्रतापरावांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते !
ना. प्रतापराव जाधव यांनी स्वीकारला पदभार..
देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य (mental health) जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हा पदभार(charge) स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.