कळमनुरी (Hingoli):- अध्यापनाच्या माध्यमातून आपण उद्याची आदर्श पिढी घडवीत आहात. तुमच्या या कार्याला माझा सलाम असून असेच कार्य आपल्या हातून घडत राहो. शैक्षणिक कार्य(Academic work) चांगले असल्यामुळेच आपल्याला हा गुरुगौरव पुरस्कार मिळालेला आहे. यापुढेही आपण आदर्श विद्यार्थी घडवावेत असे प्रतिपादन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी गुरुगौरव पुरस्कार वितरण (Award distribution) सोहळ्यात केले.
शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार जाहीर
तालुका व शहर मराठी पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा गुरुगौरव पुरस्कार हा गोदावरी मारोतराव मुद्दीराज प्राथमिक शाळा डोंगरकडा, हनुमंत विठ्ठलराव निळकंठे प्राथमिक शाळा असोला, मनुजा राजकुमार बुर्से प्राथमिक शाळा वारंगा त.ना, नागम्मा मोगलेकर प्राथमिक शाळा चाफनाथ, सुनील दत्तराव पाटील प्राथमिक शाळा कडपदेव, बळवंत राठोड प्राथमिक शाळा फुटाना,स्वाती नान्हाजी दासूद प्राथमिक शाळा मोरवड, ए.एच. सुरोशे प्राथमिक शाळा आखाडा बाळापुर, परमेश्वर विठ्ठलराव दिपके प्राथमिक शाळा पावनमारी, धोंडाबाई माधवराव पद्मसाळी प्राथमिक शाळा पिंपरी, शेख शफीक शेख जानी प्राथमिक शाळा माळेगाव, योगेश भोयर प्राथमिक शाळा जांभरुण, गजानन बालासाहेब साळुंके प्राथमिक शाळा टव्हा, संगमेश्वर कल्याणे प्राथमिक शाळा सालापुर, शेख रफिक प्राथमिक शाळा चिंचोर्डी, सुरेश होडबे प्राथमिक शाळा वाकोडी, व उर्दू विभागातून आयेशा पठाण जबिन बशिरुज्जमा खान प्राथमिक शाळा जवळा पांचाळ या शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.
ब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर शाळेत 12 सप्टेंबर रोजी गुरुगौरव पुरस्काराचे वितरण खासदार पाटील यांच्या हस्ते
या शिक्षकांना मराठी पत्रकार (journalist) संघाच्यावतीने येथील केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर शाळेत 12 सप्टेंबर रोजी गुरुगौरव पुरस्काराचे वितरण खासदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल हे होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे, प्रकल्प अधिकारी सुनील बारसे, नायब तहसीलदार डॉक्टर सीमा कायदे, स.पो. निरीक्षक विकासआडे, श्रीनिवास रोयलावार , गटशिक्षणाधिकरी दत्ता नांदे, डॉक्टर संतोष कल्याणकर, बाळासाहेब मगर , अजित मगर, शिवा शिंदे,सखाराम उबाळे, डॉक्टर शितल कल्याणकर, अब्दुल्ला पठाण ,विठ्ठल चोतमाल, राजू संगेकर,आदींची उपस्थिती होती.
पूर्वी शिक्षक पुराच्या पाण्यातून शिकविण्यासाठी गावात जायचे
पुढे बोलताना खासदार म्हणाले की, पूर्वी शिक्षक पुराच्या पाण्यातून शिकविण्यासाठी गावात जायचे, त्यांनी चांगले विद्यार्थी घडविले आहेत. त्याप्रमाणेच देशाची सेवा करणारे व आदर्श नागरिक आपल्या हातून घडले पाहिजे. आपल्या चांगल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊनच आपल्याला हा पुरस्कार मिळाला आहे असेही ते म्हणाले, यावेळी तालुक्यातील 17 शिक्षकांना गुरुगौरव पुरस्काराने खा. पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अलीमोद्दीन कादरी, सौरभ साकळे, दिलीप खोडके, शेख इलियास,मुजीब पठाण, सैफुल्ला पठाण, शफी डोंगरगावकर, शेख रफिक, गजानन पाध्ये, विठ्ठल कदम, सय्यद अझहर, अनवर नाईक आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन पतंगे यांनी केले.