परभणी/पाथरी (Parbhani):- हादगाव ते डोंगरगाव रस्त्यावरील वर लहान पुल आणि पोचमार्ग बांध काम नसल्याने हि समस्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या(Nationalist Congress) महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची भेट घेऊन त्यांचेकडे केली.ना.पवार यांनी तातडीने दखल घेत या बांधकामासह ४ कोटी ६७ लाख ५० हजाराच्या निधी मंजूरीची तरतूद प्रक्रिया करावी असे निर्देश दिल्याने या कामाच्या मंजुरीची मंत्रालय स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे.
नागरिकांना नवीन पुल बांधकामाचे आश्वासन
बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी मुंबई मंत्रालयात(Ministry of Mumbai) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.यावेळी हादगाव बु.येथील गावठाण नदीवरील नळकाडया पूल निजाम कालीन असून तो धोकादायक झालेला आह. त्या पुलावर सतत नदीचे पाणी येत आहे व ते पाणी इंदिरानगर वसाहती मध्ये जात असल्यामुळे तेथील नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होत आहे. यापूर्वी पालकमंत्री(Guardian Minister), जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पुर परिस्थितीची पाहणी करून तेथील नागरिकांना नवीन पुल बांधकामाचे आश्वासन दिले होते. या नविन पुलाचे पोचमार्गासह बांधकामासाठी अंदाजपत्रकानुसार ४ कोटी ६७ लाख ५० हजार अशा आराखड्यासह प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. असे सांगितले यावेळी ना. अजित पवार यांनी पुल बांधकाम परवानगी व निधी तरतुद करण्याचे निर्देश विभागास दिले आहेत. त्यामुळे या भागातील पावसाळ्यात उद्भवणारी समस्या आत्ता सुटणार आहे. यासह विविध विकास मागे तातडीने मंजूर केले जातील असे आश्वासन ना.पवार यांनी नखाते दांम्पत्याना दिले आहे.