बुलडाणा(Buldhana):- साधारणत: जावयाचा मान-पान सासरेबुवांना करावा लागतो, जावयाचे रुसवे-फुगवे काढण्याचे काम करावे लागते. परंतु आता सासरेबुवांचा मान-पान, रुसवे-फुगवे हे सर्व पाहण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे. ती जावई असणाऱ्या सोहम वायाळ यांच्यावर केंद्रीय मंत्री (Union Minister)म्हणून 15 जुलै रोजी जालना येथे ना. प्रतापराव जाधव येत असून, त्यांच्या प्रोटोकॉलची (protocol) पूर्ण जबाबदारी म्हणून जालन्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
एवढा मोठा सासरा असतानाही हा जावई मात्र अतिशय साधासुधा
सोहम वायाळ केंद्रीयमंत्री ना. प्रतापराव जाधव यांचे जावई, एवढा मोठा सासरा असतानाही हा जावई मात्र अतिशय साधासुधा व प्रशासकीय सेवेशी प्रामाणिक असणारा. महसूल सेवेतील अनेक अधिकारी गब्बर होत असताना, अगदी प्रोबेशनल पिरीयेडमध्ये खाजगी गाड्यांवर अंबर दिवे लावून फिरत असताना, सोहम वायाळ मात्र सासरेबुवा एवढे मोठे असतांनाही कधीही तोऱ्यात न वावरणारे आता त्यांच्याकडे अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून सासरे असणारे ना. प्रतापराव जाधव यांच्याच प्रोटोकॉलची जबाबदारी येऊन ठेपली आहे. जोपर्यंत ना. जाधव हे जालना जिल्ह्यातून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत त्यांना काय हवे नको ? हे सर्व बघण्याची जबाबदारी या प्रोटोकॉलनुसार वायाळ यांच्यावर असणार आहे !