Nagpur Case:- रिल्स करण्याचा नाद अनेकदा जीवावर बेततो याची अनेक उदाहरणं गेल्या काही दिवसांत समोर आली असली तरी हुल्लडबाजी आणि स्टंट (Stunt) करण्याचं काही कमी झाल्याचं दिसत नाही. नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावाच्या ओव्हरफ्लो (overflow) पॉईंटवर हुल्लडबाजी करणं तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.
तलावाच्या ओव्हर फ्लोवर पॉईंटवर स्टंट करणं तीन तरुणांच्या अंगाशी आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे तीन तरुण स्टंट करत असताना, त्यांना बाकीचे लोक ओरडून चेतावत होते. काहींनी साथ दिली तर काहींनी ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.




