परभणी/सोनपेठ (Parbhani):- तालुक्यातील भाऊचा तांडा शेजारी असलेल्या जांबवाडी येथे भरधाव वेगाने जानारा ऑटो अचानक पलटी होवून झालेल्या अपघातात (Accident) एकाचा जागीच मृत्यू झाला. हि घटना मंगळवार ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सोनपेठ हून गंगाखेडकडे भरधाव वेगाने जाणारा ऑटो भाऊचा तांडा शेजारी असलेल्या जांबवाडी येथे अचानक पलटी झाला. या अपघातात ऑटो चालक गणेश बाबुराव चव्हाण वय ३० वर्ष रा.खडका हे जागीच ठार झाले. गणेश चव्हाण यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव (Bleeding) झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोनि.सुर्यमोहन बोलमवाड यांच्यासह कर्मचार्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गणेश चव्हाण यांना सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात आनले असता डॉ.भारत चव्हाण यांनी तपासुन मृत (Dead) घोषीत केले. सोनपेठ ते शेळगाव महामार्गवर अपघाताच्या घटनामध्ये वाढ झाली आहे.