देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Bangladesh Hindu justice) : हिंदू धर्म जगातून नामशेष करण्याचा कट्टरपंथींचा प्रयत्न सुरु आहे. बांग्लादेशातील हिंदूसह सर्वच अल्पसंख्यांक समाजांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष कायम राहील, यासाठी आज देशभरात हिंदू एकत्र आले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज केले.
बांग्लादेशातील हिंदूंसह (Bangladesh Hindu justice) अन्य अल्पसंख्यांक समाजांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून मोर्चे काढून रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर व्हेरायटी चौकात पार पडलेल्या सभेत आंबेकर बोलत होते. भाजपचे शहराध्यक्षबंटी कुकडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण सभा 10 दिस्मबर 2024 व्हेरायटी चौक, न दटके, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश मंत्री, मुधोजीराजे भोसले, गोविंद शेंडे, प्रशांत चितळे, महंत शिवानंद महाराज, सविता मते, भदंत गौतम आदी उपस्थित होते.
सुनील आंबेकर म्हणाले, भारत सरकारने कट्टरपंथींविरोधात अधिक ठोस उपाययोजना कराव्यात. (Bangladesh Hindu justice) बांग्लादेशात राजकीय घडामोडींसह हळूहळू वाढत गेलेला शासनाविरोधातील आक्रोश हिंदूविरोधात प्रकटला. मंदिरांमध्ये जाळपोळ, महिलांवर अत्याचार झाले. त्यामुळे संपूर्ण हिंदूसमाज दुःखी झाला. पण, तेवढ्यावर भागणार नाही. बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणीस्तानातील हिंदूंना आपले मानतो. त्यांच्यावर अत्याचार होत असेल तर केवळ दुःख करून चालणार नाही, तर राग व्यक्त करावा लागेल. आज संपूर्ण भारत तिथल्या हिंदूंच्या बाजुने उभा आहे.
बांग्लादेशातील घटना (Bangladesh Hindu justice) घडविणाऱ्या शक्तींना ओळखण्याची गरज आहे. भारत सरकारने जागतिक पटलावर हा विषय मांडून बांग्लादेश विरोधात एकमत निर्माण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बंटी कुकडे यांनी या मंचावरून बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है चा नारा बुलंद केला. बांग्लादेशमध्ये १२ लाख सैनिक असून त्याहून अधिक कैदी आज भारतातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये आहे. त्यांना मोकळे केले तरी बांग्लदेश साफ होईल. ढाकाच्या आत शिरून मारून, असा सज्जड दम त्यांनी दिला. यावेळी बांगलादेशात सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. त्यात हिंदूंवरील अत्याचार ताबडतोब थांबावे, इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास महाराज यांची तुरुंगातून तत्काळ मुक्तता करावी.
बांगलादेशातील (Bangladesh Hindu justice) स्थिती पूर्वपदावर यावी आणि जगातून हिंदू धर्म नामशेष करण्याचा कट्टरपंथीयांचा प्रयत्न आरती अदानीकडून बांग्लादेशला होणारा वीजपुरवठा थांबवा यावेळी महिलांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सविता मते यांनी निर्बंध लागून बांग्लादेशचा गळा आवळण्याची मागणी केंद्र सरकार कडे केली. अदानी समूहाकडून बांग्लादेशला वीजपुरवठा होतो. तो रोज किमान पाच तास बंद ठेवा. सर्वप्रकारचा व्यापार थांबवा. सत्यशोधन समिती तयार करून तातडीने बांग्लादेशात पाठवावी. भारतीय विद्यापीठांमध्ये २० हजार बांग्लादेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना तातडीने हाकलून द्या, अशी सूचना त्यांनी केली.
तेथील सर्व अल्पसंख्य समाजाचे जीवन सुकर आणि सुरक्षित व्हावे, यासाठी सकल हिंदू समाजातर्फे भारत आणि (Bangladesh Hindu justice) बांगलादेश सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. भारत सरकारतर्फे बांगलादेश सरकारला कठोर इशारा दिला जावा तसेच मानवाधिकारवादी संघटनांनी हा मुद्दा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरावा, अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आली आहे. निवेदनावर सकल हिंदू समाजाचे संयोजक अमोल ठाकरे, राजेश लोया, अरविंद कुकडे, रवींद्र बोकारे, संजय भेंडे, प्रगती पाटील, मुधोजीराजे भोसले, श्रीमंत माता राजेश्वरी, महंत भगीरथ महाराज, ह.भ.प. श्रीरामपंत जोशी, महामंडलेश्वर माधवदास महाराज, निर्मलानंद महाराज, गणू दास महाराज, महंत सूर्यानंदजी महाराज, महंत शिवानंद महाराज, डॉ. सुबोध विश्वास, रमेश मंत्री, वृषाली जोशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.