DHULE :- एसटी प्रवासादरम्यान एका तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी उघड झाली असून, दोन सराईत महिलांना देवपूर पोलिसांनी अटक केली आहे. या महिलांकडून प्रवाशाच्या बॅगेतून चोरलेली 4 लाख 9 हजार 500 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
महिला पोलीस कर्मचार्यांनी संशयित महिलांची व त्यांच्या बॅगची घेतली झडती
शिवाजी पाटील हे दोंडाईचा येथून धुळे येथे येण्यासाठी नंदुरबार-धुळे बसमध्ये प्रवास करत असताना सोनगीर येथून दोन महिला बसमध्ये चढल्या. त्यातील एक महिला शिवाजी पाटील यांच्या शेजारी बसली. तिने नगाव चौफुली (देवपूर, धुळे) येथे पाटील यांच्या बॅगेची चैन उघडून त्यातील 4 लाख 9 हजार 500 रुपये काढून दुसर्या महिलेने दिलेल्या बॅगेत ठेवले. मात्र, ही बाब बसमध्ये असलेल्या मोहित समाधान पाटील याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा केली. तसेच बस थेट देवपूर पोलीस ठाण्यात आणली. त्यानंतर महिला पोलीस कर्मचार्यांनी संशयित महिलांची व त्यांच्या बॅगची झडती घेतली असता संपूर्ण रक्कम मिळून आली. पदमा राहुल शेट्टी (वय 20, रा. चिखलठाणा, औरंगाबाद) व अक्षया राजन शेट्टी (वय 20, रा. चिखलठाणा, औरंगाबाद) अशी दोघा महिला चोरट्यांची नावे असून त्याच्याविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.